कल्याणमध्ये भुयारी मलनिस्सारण वाहिन्यांचे पाणी रस्त्यावर

सांडपाण्यामुळे नागरी आरोग्याला धोका


कल्याण: कल्याणातील मुख्य रस्त्यावर अंडर ग्राउंड ड्रेनज लाईनच्या चेम्बरची झाकणे खाली दबली गेली असून त्या चेम्बरमधून दुर्गंधी युक्त प्रक्रिया न केलेले सांडपाणी वाहत असल्याने नागरी आरोग्यासह संभाव्य रोगराईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


कल्याण पश्चिमेतील राजा हॉटेल परिसरात केडीएमसी मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शंकरराव चौक ते टिळक चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर अंडर ग्राऊंड ड्रेनज लाईनच्या चेम्बरचे झाकण १७ मे रोजी तुटल्यामुळे दुर्गंधी युक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. या संदर्भात कल्याण डोंबिवली मनपामध्ये दक्ष नागरिक योगेश मोकाशी यांनी तक्रार केली होती. तरी देखील केडीएमसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने संभाव्य रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


"क" प्रभाग क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या शंकरराव चौक ते टिळक चौक रस्त्यावर वाहनासह करदात्या नागरिकांची वर्दळ असते. रस्त्यावर वाहत असलेल्या दुर्गंधी युक्त सांडपाण्यातून त्यांना ये जा करावी लागते हे दुर्दैव म्हणावे लागेल. मनपा क्षेत्रात अंडर ग्राउंड ड्रेनज लाईनच्या माध्यमातून सांडपाणी, मलयुक्त घाण मलनिस्सारण केंद्रापर्यंत नेत प्रक्रिया करून सांडपाणी बागा, इतर तत्सम कामासाठी वापर करण्याचे प्रशासनाचे नियोजन असते. पंरतु अंडर ग्राऊंड चेम्बरची झाकणे तुटून चेंबरांच्या तुंबापुरीमुळे रस्त्यावर सांडपाणी वाहत असेल आणि त्यावर कारवाई होत नाही, म्हणजे नागरिकांच्या जीवनाशी खेळ चाललेला असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.


हीच परिस्थिती ब प्रभागक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पौर्णिमा चौक ते प्रेम आँटो मुरबाड रोड या मुख्य रस्त्यावर रोशन पेट्रोल पंपासमोर अंडर ग्राऊन्ड चेम्बरचे झाकण खचल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी युक्त सांडपाणी वाहत असून यातच मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरूंद झाला असून वाहनांची प्रचंड वर्दळ यातून जीव मुठीत धरून पादचाऱ्यांना दुर्गंधी युक्त सांडपाण्यातून वाट काढत चालवी लागत आहे. यात या परिसरात खाजगी हॉस्पिटलची संख्या आणि येणाऱ्या रूग्णांना देखील यांचा फटका बसत आहे. सांडपाण्यातून चालत गेल्यामुळे रोगराईला आमंत्रण दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.


भुयारी मलनिस्सारण वाहिन्या सफाई ठेकेदाराला निलंबित केले असून, या कामासंदर्भात नवीन नविदा काढण्यात आल्या. प्रतिवर्षासाठी 3 कोटी ६० लक्ष रू तरतूद असून यामध्ये ठेकेदाराने १ सक्शन वाहन, २ जेटिंग वाहने, ४ ग्राँफ बकेट वाहने आदींच्या सहाय्याने चोक अप आदी काम करणे अपेक्षित असते, असे पालिका सूत्रांनी सांगितले.

Comments
Add Comment

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या

ठाणे हायस्पीड रेल्वे स्टेशन होणार देशातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन

आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ठाणे : ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे. शहराचे आमूलाग्र