पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ‘उत्सव वसुंधरे’चा उपक्रम

ठाणे : ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या (5 जून) निमित्ताने विविध उपक्रम आयोजित केले जातात. ठाणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गुरुवार ५ जून ते रविवार ८ जून या काळात नौपाडा येथील गावदेवी मैदानात 'उत्सव वसुंधरेचा, संकल्प हरित ठाण्याचा' या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिक, विद्यार्थी, गृहसंकुलांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी या उत्सवात प्रदर्शन, कार्यशाळा, स्पर्धा आणि परिसंवाद अशी अनोखी पर्वणी असणार आहे. पर्यावरणाविषयी जागृती करणाऱ्या या उपक्रमात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.


पर्यावरणाविषयी जागृती करण्याबरोबरच, घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन, पर्यावरणपूरक जीवनशैली यांच्याविषयी उपलब्ध असलेले पर्याय नागरिकांना माहीत व्हावेत, यासाठी या उत्सवाचे आयोजन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. 'शून्य कचरा आणि पर्यावरण प्रदर्शन २०२५' अशी या उत्सवाची संकल्पना आहे. त्यातील, पर्यावरण संवर्धन भव्य प्रदर्शनात पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकला पर्यायी वस्तू, सौर ऊर्जा, मलनि:सारण प्रकल्प, हवा सर्वेक्षण उपकरणे यांच्याशी निगडित दालने असतील. गुरूवार ५ जून रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्याच समारंभात, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या जिंगलचेही प्रथमच प्रसारण करण्यात येईल. तसेच, वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या गृहसंकुलांना पारितोषिकांचे वितरणही करण्यात येईल.


शुक्रवार ६ जून रोजी ऋषिकेश पानकर यांच्या मार्गदर्शनात 'कचऱ्यातून कला' आणि आदित्य हिंदलकर यांच्या मार्गदर्शनात 'शाडू मातीपासून मूर्ती घडविणे' या दोन कार्यशाळा होतील. तसेच, 'पर्यावरणपूरक जीवनशैली' हा परिसंवाद होणार असून त्यात, लता मेनन (शाडू मातीचा पूनर्वापर), रोहित जोशी (पर्यावरणपूरक गणेशोत्सव), दिलीप काकवीपुरे (जैवविविधता आणि आपण), अपर्णा कुलकर्णी (पर्यावरण शाश्वततेचे भारतीय प्रारुप), प्राचिन्मय (शाश्वत पर्यावरण आणि शाश्वत सेवार) हे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.


शनिवार ७ जून रोजी 'कबाड बॅण्ड' ही श्रीपाद भालेराव यांच्या मार्गदर्शनात, पौर्णिमा शिरगावकर यांच्या मार्गदर्शनात 'कुंडीत रोपे लावणे', तसेच, 'कागदी पिशव्या बनवणे' ही प्रिया कणसे यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळा होईल. त्याचबरोबर, 'घरगुती कचरा व्यवस्थापन' या परिसंवादात सुरभी ठोसर, सुनिलीमा, लता घनश्यामानी (सॅनिटरी वेस्ट व्यवस्थापन) हे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. त्याच दिवशी, 'होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा' हा मनोरंजनपर कार्यक्रमही होईल.


रविवार, ०८ जून रोजी या उत्सवाची सांगता होईल. त्या दिवशी, 'शाश्वत पर्यावरण' या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात, संदीप अध्यापक (शाश्वत इमारत व्यवस्थापन), प्रदीप घैसास (निसर्गावर आधारित पर्याय), शरद पुस्तके (ऊर्जा व्यवस्थापन) हे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. तसेच, सुरेश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली 'नैसर्गिक रंग प्रशिक्षण' कार्यशाळा होईल. समारोप, सर्व स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाने होणार आहे.

Comments
Add Comment

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या