Vaishnavi Hagawane Case: गळफास घेतलेल्या पंख्याची आणि साडीची देखील होणार फॉरेन्सिक तपासणी

पुणे: पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सासरच्या होणाऱ्या त्रासामुळे आणि मारहाणीला कंटाळून वैष्णवी हगवणेने आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, ही आत्महत्या नसून तिच्या सासरच्या लोकांनी हत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला. ज्याच्या आरोपाखाली वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेसह सासरे, सासू, नणंद आणि दीर या सर्वांची पोलिस चौकशी केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात अनेक बारीक सारिक गोष्टींची तपासणी केली जात आहे. ज्यामध्ये आरोपींचे मोबाईल फोन, लॅपटॉपचा समावेश तर आहेच पण आता वैष्णवीने गळफास घेण्यासाठी वापरलेल्या साडीची आणि पंख्याची देखील फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.



साडी आणि पंखा फॉरेन्सिक लॅबमध्ये रवाना


वैष्णवीने गळफास घेतला तो पंख किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार आहे. तसंच वैष्णवीचा पती, सासरा आणि दिराला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या तिघांची आज पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळे अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत वाढ करण्यासाठी लवकरच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.


Comments
Add Comment

तणाव वाढला, तैवान जवळ पोहोचला चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा

तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला

ठाणे पोलिसांनी ज्येष्ठांसाठी विकसित केला ‘आधारवड’ मोबाइल अॅप

ठाणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या

सुबोध भावे साकारणार निम करोली बाबा

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी झेप घेत आहे. तो लवकरच येणाऱ्या

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...! महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात

सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित