मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावात भरधाव बसची रिक्षाला धडक; रिक्षा चालकाचा मृत्यू, ३ जखमी

माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (दि. २) रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गुरुकृपा हॉटेल समोर भरधाव खासगी बसने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षा चालकाला गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे, तर तिघेजण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


माणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक अशोक सोनार (६५) हे मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करीत होते. त्यावेळी ते रस्ता ओलांडून जात असताना मुंबईकडून महाडकडे जाणाऱ्या बसची त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक लागली. या भीषण अपघात रिक्षाचालक अशोक सोनार यांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी परी सोनार (११), अश्विनी दळवी (३०) व साईशा दळवी (४) हे तिघेजण जखमी झाले आहेत.



या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, बसचालक कालिदास बाबुराव कोकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार हे करीत आहेत.

Comments
Add Comment

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आता एक

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात