Samruddhi Mahamarg Accident : भीषण अपघात! समृद्धी महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक; चालकाचा जागीच मृत्यू

नागपूर : समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली कार नागपूर कॉरिडॉरवरील डोणगावजवळ ट्रकला मागून जोरात धडकली. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीची ओळख भूषण बळीराम मगर (रा. मानका, जिल्हा वाशिम) अशी आहे. ते छत्रपती संभाजीनगरहून वाशिमकडे परतत होते.



प्राथमिक तपासानुसार, चालकाला डुलकी आल्यामुळे वाहनाचा ताबा सुटून हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तत्काळ धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. ही घटना पाहता, समृद्धी महामार्गासारख्या उच्चगती मार्गांवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि प्रवासादरम्यान योग्य विश्रांती घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग