वृद्ध, सहव्याधी नागरिकांनी मास्कचा वापर करावा

मुंबई : कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना, वृध्द, सहव्याधी असलेले लोक आणि रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता असलेल्या लोकांनी कमी हवेशीर किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे किंवा अशा ठिकाणी मुख पट्टी अर्थात फेस मास्क वापरावा, अशाप्रकारचे निर्देश आरोग्य विभागाकडून महापालिकेला दिले आहेत.


राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे कोविड १९बाबतच्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त्त यांना २ जून २०२५ रोजी परिपत्रकाद्वारे केले आहे. यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने जारी केलेल्या परिपत्रकांमध्ये असे म्हटले आहे. विविध कारणांमुळे होणारे इन्फ्लुएंझा, सार्स, आरएसव्ही सारखे विषाणूजन्य आजार हंगामी चढ-उतारम्हणून समुदायात दिसून येतात. सध्या प्रसारीत होणाऱ्या प्रकारामध्ये (व्हेरिएंट) जेएन१, एक्सएफजी आणि एलएफ ७.९ हे आहेत. या प्रकारांमुळे ताप, खोकला, घसा खवखवणे यासारखे सौम्य आजार होतात. देशात २८ मे २०२५ पर्यंत कोविड-१९ चे एकूण १६२१ रुग्ण सक्रिय आहेत,


देशातील एकुण सक्रिय प्रकरणांपैकी ९०% पेक्षा जास्त प्रकरणे केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या ६ राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या अंदाजे ५०६ रुग्ण सक्रिय असून त्यामधील बहुतांश प्रकरणे मुंबईतील आहेत. यापैकी बहुतांश प्रकरणे सौम्य असली तरी, पुरेशी खबरदारी म्हणून, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना खालील उपाययोजना करण्याबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. जिल्हा, उपजिल्हा पातळीवर तसेच वैद्यकीय महाविद्यालये, इतर शिक्षण/तृतीय सेवा संस्था, महानगरपालिका तथा नगरपरिषद रुग्णालये आणि इतर सर्व आंतररुग्ण सेवा सुविधांमध्ये रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला जावा. रोगनिदान, आवश्यक औषधे, पीपी किट, आयसोलेशन बेडस्, मेडीकल ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडस् यांच्या पुरेशा उपलब्धतेवर भर देण्यात यावा. एकंदर ऑक्सिजन प्रिपरनेस सुनिश्चित करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात यावे. याबाबतच्या केलेल्या कार्यवाहीचा कृती अहवाल तात्काळ सादर करावा.


तीव्र श्वसन आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याचे स्वयंनिरीक्षण ठेवावे आणि जर धाप लागणे, छातीत दुखणे इत्यादी लक्षणे जाणवल्यास जवळच्या आरोग्य सुविधांना कळवावे. या मार्गदर्शक तत्वांनुसार याबाबतच्या आवश्यक संपूर्ण तयारीसाठी आपले सामूहिक प्रयत्न करावे अशाप्रकारचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

Comments
Add Comment

BMC Elections : ही सुट्टी म्हणून घरात बसून राहू नका...; नाना पाटेकरांचे मतदारांना कळकळीचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र आज एका मोठ्या राजकीय वळणावर उभा आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २,८६९ जागांसाठी आज मतदान

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान

Viral Video :चालत्या बाईकवर 'हायव्होल्टेज' ड्रामा!...लोक पाहत राहिलीत..!

मुंबई: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका अशा व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे जो पाहून

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

Mumbai : किरकोळ वादातून मारामरी,रागाच्या भरात मित्रानेच घेतला...नक्की काय घडलं ?

Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच