अहिल्यानगर जिल्ह्यात पाच महिन्यांत ७८२ जण बेपत्ता

१०४ अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याने पालकांची वाढली चिंता


अ. नगर : चोऱ्या, हाणामाऱ्या, अपहरण, विनयभंग, मर्डर अशा गुन्हेगारी घटनांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात दिवसेंदिवस क्राईम रेट वाढत असतानाच त्यात मुली मिसिंगची भर पडली आहे. गत १४० दिवसांत १८ वर्षांखालील ११४ अल्पवयीन मुले राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बेपत्त्ता ११४ मध्ये १० मुले, तर तब्बल १०४ मुलींचा समावेश चिंताजनक बाबही समोर आली आहे.


पोलीस क्राईम रेव्ह्यूअंतर्गत प्राप्त माहितीनुसार, १ जानेवारी ते २७ मे या साधारणतः पाच महिन्यांच्या कालावधीत १५ ते २४ वयोगटातील ७८२ जण बेपत्ता झाले आहेत. यात तब्बल ६१७ मुली, महिलांचा समावेश असून, १६५ मुलांची, युवकांची नोंद आहे. या आकडेवारीनुसार संबंधित १४० दिवसांमध्ये दररोज पाच मुली, महिला घर सोडून निघून गेल्याचे पुढे आले आहे.


राज्यातील विस्ताराने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगरकडे पाहिले जाते. तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे असल्याने पोलीस अधीक्षकांना शहरासह १४ तालुक्यांतील गुन्हेगारी रोखण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे कारण सांगितले जाते. गुन्हेगारी घटनांसह आता अचानक राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता होणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींची संख्या अस्वस्थता वाढविणारी आहे.

Comments
Add Comment

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी