विक्रोळी उड्डाणपूल लवकरच वाहतूक सेवेत दाखल

  30

मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अानुषंगाने मार्ग रेषा आखणी, वाहतूक बेट, वाहतूक दिवे उभारणीची कामे प्रगतिपथावर असून ती येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली. मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या समन्वयाने विक्रोळी पुलाची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामांची कालमर्यादा ३१ मे २०२५ अशी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी निश्चित केली होती.



या अानुषंगाने विहित कालावधीत पुलाची सर्व मुख्य कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व – पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. प्रवास वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत एकूण १८ तुळया टाकण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत एका बाजूकडील ध्वनिरोधक, रंगकाम आणि पश्चिमेकडील बाजूवर मार्ग रेषा आखणीआदी कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले

मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर

प्रभाग रचना जुन्याच पद्धतीने, पण घातली विकास आराखड्याची सांगड मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक

तुकाराम मुंढेंची २३वी बदली दिव्यांग कल्याण विभागात

मुंबई  : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम

Kajol Honoured With Maharashtra State Film Awards : “आईच्या साडीचा अभिमान… पुरस्कार स्विकारताना काजोल भावूक”, काजोलचं मराठी भाषण ठरलं खास आकर्षण

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला मुंबईत पार पडलेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात

दूध भेसळीचे प्रमाण कमी करण्यासाठी दूध स्कॅनर

मुंबई (वार्ताहर) : दूध भेसळीमुळे सर्वसामान्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे रोखण्यासाठी

सणासुदीच्या हंगामात नारळ, डाळींचे चढे दर

मुंबई (वार्ताहर) :सध्या सणांचा काळ सुरु झाल्यामुळे डाळी तसेच नारळाचा वापर धार्मिक विधी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी