एसटी प्रवासात आता पुरुषांनाही मिळणार १०-१५ टक्के सवलत

मुंबई: एसटीच्या प्रवासात आता महिलांप्रमाणे पुरुषांना देखील एसटी प्रवासात सवलत मिळणार आहे. आता एसटी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के सवलत देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे रविवारी (दि.१) आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि पुरस्कार सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.



फ्लेक्सी फेअर योजना


मंत्री सरनाईक यांनी लांब पल्ल्याच्या प्रवासात आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के सवलत देण्याची मोठी घोषणा केली. कमी गर्दीच्या हंगामात प्रवाशांची संख्या वाढावी हा यासाठी लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत देण्याची घोषणा सरनाईक यांनी केली. फ्लेक्सी फेअर असं या योजनेचं नाव असेल. येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा ई- शिवनेरी सारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे. या योजनेचा उद्देश प्रवाशांना परवडणारा आणि आकर्षक प्रवासाचा अनुभव देणे आहे.

जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च यादरम्यान एसटीने प्रवास करणार्‍यांची संख्या कमी असते. प्रवाशांची संख्या कमी असली, तरी एसटीला खर्च तितकाच येतो. त्यामुळे फ्लेक्सी फेअर योजना या काळात लागू केल्यास एसटी महामंडळाला मोठा फायदा होऊ शकतो, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे ही योजना एसटीसाठी फायद्याची ठरेल, असे सांगण्यात येतेय. तसेच एसटीला देशातील क्रमांक एक ची परिवहन संस्था बनवण्याचे ध्येय ठेवले असून प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेही आपले उद्दिष्ट आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले, "गेल्या 77 वर्षांपासून एसटीने ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता चांद्यापासून बांद्यापर्यंत, गावखेड्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत सर्वांना सातत्याने प्रवासी सेवा दिली आहे. देशात 75 वर्षांहून अधिक काळ टिकून राहिलेल्या मोजक्याच संस्था आहेत आणि एसटी त्यापैकी एक आहे. एसटीचे सामाजिक महत्त्व 77 वर्षांनंतरही अजिबात कमी झालेले नाही. भविष्यातील दळणवळण क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एसटी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे, असेही ते म्हणाले.
Comments
Add Comment

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व

मुंबईत अर्धवट राहिलेल्या ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात, १५० कामे अद्याप थांबलेलीच

मुंंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अर्धवट कामांना आता

मुुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर धारावी प्रकल्पाचे होणार कास्टींग यार्ड?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या

Rain Update : 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha)

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक