भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या घरात घुसला

  30

मुलांच्या धाडसामुळे आई बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली


अकोले :अकोले तालुक्यातील देवठाण गावातील काळे वस्तीवर भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या घरात घुसला व घरातील मायलेकावर हल्ला केल्याची खळबळ जनक घटना गुरुवारी राञी दिड वाजन्याच्या सुमारास घडली.दोन्ही मुलांच्या धाडसा मुळे आई बिबट्याच्या हल्यातून बचावली.या घटने मुळे देवठाण व परीसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.


किसनाबाई रामहारी काळे (वय -५७) व वैभव रामहारी काळे ( वय २७)अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. देवठाण येथील पाटाच्या कडेला असणाऱ्या काळे वस्तीवरील घरात रात्री जेवणानंतर सर्व जन झोपलेले होते. रात्री दीड वाजेच्या सुमारास मांजराच्या मागे बिबट्या लागला.तो दरवाजा तोडून थेट घरात गेला.घराचे दरवाजाचा आवाज आल्यामुळे किसनाबाई या उठल्या.त्यांनी बिबट्या पाहिल्या वर आरडा ओरडा केला. त्यामुळे त्यांची मुले उठली.त्यांनी आई किसनाबाई हिचे वर सुरू असणारा बिबट्याचा हल्ला परतावून लावला.पण या हल्ल्यात बिबट्याचा पंजा लागल्याने किसनाबाई यांचे डोक्याला गंभीर इजा झाली आहे.डोक्यातून मोठा रक्तस्राव वाहत होता.


उपचारा नंतर त्यांच्या डोक्याला दहा टाके पडले आहेत तर वैभवच्या पाठीवर व हाताला बिबट्याचा दात लागल्याने तोही जखमी झाला.या सर्व गोंधळात बिबट्या काही वेळ घरातील आतील खोली मध्ये शिरला.काही वेळ घरात थांबून होता. नंतर त्याने तेथून अलगद पोबारा केला.या घटनेची माहिती देवठाण गावचे माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांना मिळताच त्यांनी अकोले वनविभागाचे धिंदळे यांना फोन केला.त्यानंतर लगेचच धिंदळे व त्यांचे सहकारी अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळ व परिसराची पाहणी केली.


जखमींना प्रथमोउपचारासाठी किसनाबाई रामहारी काळे व वैभव रामहारी काळे यांना देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करुन नंतर नाशिक येथिल सिव्हिल रूग्णालयात येथे हलवण्यात आले होते. तेथून अकोले येथील डॉ. भांडकोळी हॉस्पटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.बिबट्याच्या या हल्ल्यामुळे देवठाण गाव व वस्ती परिसरात घबराट निर्माण झाली आहे. किसनाबाई रामहारी काळे व वैभव रामहारी काळे यांना वनविभागाकडुन तातडीने उपचार व मदत मिळावी पाहिजे व काळे वस्तीवर तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी देवठाण ग्रामस्थांनी केली आहे.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची