जामखेडचा राज्यात डंका

  24

महाअवास अभियान २०२२-२३ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक


जामखेड : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राबविण्यात आलेल्या महाअवास अभियान २०२२-२३ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेल्या यशस्वी तालुक्यांमध्ये जामखेड तालुक्याची निवड ही एक गौरवाची बाब आहे.ही कामगिरी राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या श्रेणीत सर्वोत्तम मानली गेली आहे.


या यशाबद्दल लाभार्थी मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ३ जून २०२५ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल,बालेवाडी,पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात जामखेड तालुक्याचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.कार्यक्रमास केंद्रीय ग्रामविकास व कृषिमंत्री मा.शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे,जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री मा.अजित पवार,तसेच ग्रामविकास मंत्री मा.जयकुमार गोरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



महाअवास अभियान २०२२-२३ अंतर्गत जामखेड तालुक्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे,ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.याआधीही २०२१-२२ मध्ये नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान जामखेडने पटकावला होता.यशाचा हा सातत्यपूर्ण प्रवास वरिष्ठ अधिकारी,सहकारी कर्मचारी, जनप्रतिनिधी, पत्रकार,ग्रामस्थ आणि लाभार्थी यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाला आहे.जामखेडसारख्या अवर्षण प्रवण तालुक्याचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणे ही आपल्या सर्वांचीच एक सामूहिक उपलब्धी आहे, आणि ती निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
- प्रकाश पोळ, तत्कालीन गटविकास अधिकारी

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ