सौदी अरेबिया भारतात करणार अब्जावधींची गुंतवणूक

नवी दिल्ली : भारत आणि सौदी अरेबियामधील संबंध आणखी दृढ होणार आहेत. मोदी सरकारने सौदी अरेबियाला भारतात अब्जावधींची गुंतवणूक करणे शक्य व्हावे यासाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळे सौदी अरेबियाला भारतात अधिक गुंतवणूक करता येईल. सध्या सौदी अरेबियातील कंपन्यांचे बरेच पैसे मुकेश अंबानींच्या कंपन्यांमध्येच गुंतवले जातात. पण नियमांतील बदलांमुळे सौदी अरेबियातील कंपन्या भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात अब्जावधींची गुंतवणूक करू शकतील.

सध्याच्या नियमांनुसार, जर एखादी परदेशी कंपनी भारतात गुंतवणूक करते, तर तिची वेगवेगळ्या भागांमधून येणारी गुंतवणूक एकच मानली जाते. कंपनीमध्ये गुंतवणुकीची मर्यादा दहा टक्के निश्चित करण्यात आली आहे. या नियमामुळे सौदी अरेबियाच्या शाही कंपन्या भारतात भारतात जास्त गुंतवणूक करू शकत नव्हत्या. पण भारताने नियमांत केलेल्या बदलांमुळे सौदी अरेबिया भारतातील गुंतवणुकीत वाढ करू शकेल.

भारत सरकारने सौदी अरेबियाच्या पीआयएफला (Public Investment Fund or PIF is Saudi Arabia's sovereign wealth fund / पीआयएफ म्हणजे सौदी अरेबियाचा सार्वभौम संपत्ती निधी ) कठोर नियमातून वगळले आहे. पीआयएफच्या वेगवेगळ्या कंपन्या आता भारतात स्वतंत्र गुंतवणूक करू शकतील. यामुळे त्यांना भारतीय शेअर बाजारात पैसे गुंतवणे सोपे होईल.

सौदी अरेबियाकडे भरपूर पैसा आहे आणि भारताला विकासासाठी तो पैसा हवा आहे. सौदी अरेबियाला भारतासारख्या आर्थिकदृष्ट्या वेगाने वाढणाऱ्या देशांमध्ये गुंतवणूक करायची आहे. 'व्हिजन २०३०' अंतर्गत सौदी अरेबियाला आपल्या अर्थव्यवस्थेला तेलावरील अवलंबित्वापासून मुक्त करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिलमध्ये सौदी अरेबियाला भेट दिली. या भेटीवेळी दोन्ही देशांनी ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि औषध यासारख्या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. भारत आणि सौदी अरेबिया द्विपक्षीय गुंतवणूक करार (BIT) वर देखील वाटाघाटी करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाकडे ९२५ अब्ज अमेरिकन डॉलर एवढा सार्वभौम संपत्ती निधी आहे. सध्या पीआयएफने भारतात मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये दिड अब्ज अमेरिकन डॉलर आणि रिलायन्स रिटेलमध्ये १.३ अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवले आहेत.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. त्याला तेलाने समृद्ध आखाती देशांकडून दीर्घकालीन गुंतवणूक हवी आहे. त्याच वेळी, सौदी अरेबियाला त्यांच्या 'व्हिजन २०३०' योजनेअंतर्गत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक वाढवायची आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, दोन्ही देशांनी २०२४ मध्ये एक उच्चस्तरीय कार्यदलांची स्थापना केली आहे. सौदी भारतात १०० अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवण्याचे नियोजन करत आहे. या गुंतवणुकीला भारत सरकार करसवलत देणार आहे. यामुळे भारताच्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रांना मदत होईल.
Comments
Add Comment

PM Narendra Modi : परदेश दौऱ्यावरून परतताच मोदींची तातडीची बैठक; पेट्रोल-एलपीजीवर मोठा निर्णय?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. जवळपास वर्षभरानंतर होत असलेल्या

Cockroach Janta Party : मराठी तरुणाची ‘कॉक्रोच जनता पार्टी’ देशभरात ट्रेंडिंग; ५ दिवसांत १० मिलियन फॉलोअर्स!

मुंबई : देशभरात सध्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सुरुवातीला

Meta Layoffs 2026 : मेटामध्ये मोठी कर्मचारी कपात; तब्बल ८,००० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली!

मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या ‘मेटा’ने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत

Bandra News : वांद्रे परिसरातील जागेवरील कारवाईदरम्यान राडा; जमावाला रोखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील गरीबनगर भागात अवैध बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान सलग

Thane Fire : ठाण्यात गावदेवी मार्केटला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाचे जवान जखमी

ठाणे : ठाणे पश्चिममधील नौपाडा परिसरातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटच्या इमारतीला गुरुवारी पहाटे भीषण आग

KKR vs MI : KKR च्या विजयाने राजस्थानचं टेन्शन वाढलं, प्लेऑफचं गणित पुन्हा बदललं

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL) काल झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुंबई इंडियन्सचा (MI) ४