विराट कोहलीच्या बंगळूरूमधील पब-रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल

बंगळूरू: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या पब-रेस्टॉरंटवर बंगळूरू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विराटच्या वन8 कम्यून या पब- रेस्टॉरंटमध्ये नो स्मोकिंग झोन नसल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप क्रिकेटर विराट कोहली अथवा रेस्टॉरंटकडून कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यात आलेले नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूच्या कब्बन पार्क पोलिसांनी एका विशेष अभियानांतर्गत एकूण 5 बार आणि रेस्टॉरंट विरोधात कारवाई केली आहे. यात विराट कोहलीच्या मालकीच्या वन8 कम्यून पब आणि रेस्टॉरंटचाही समावेश आहे. या पबमध्ये नो स्मोकिंग झोन नाही, असे पोलिसांना आढळून आले. यामुळे त्यांनी, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल स्वतःहूनच केस दाखल केली आहे.


कोहलीच्या पबवर कायदेशीर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यातही वन8 कम्यून पब आणि रेस्टॉरंट विरोधात केस दाखल केली होती. जुलै, 2024 मध्ये वन8 कम्यून पबच्या मॅनेजरवर, पब बंद करण्यासंदर्भातील वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्यावरून एफआयआर दाखल करण्यात आली होती. कब्बन पार्क पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, कस्तूरबा रोडवरील वन8 कम्यून पब ६ जुलैला बंद करण्याच्या वेळेनंतरही, 1.20 वाजेपर्यंत खुलाच होता आणि ग्राहकांना सर्व्हिस देत होता.


विराट कोहली हा वन8 कम्यूनचा मालक आहे. हे रेस्टॉरंट बंगळुरू येथे डिसेंबर, 2023 ला सुरू करण्यात आले आहे. या रेस्टॉरंटच्या शाखा दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकाता आणि गुरुग्राम सारख्या शहरांत आहेत.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या