Stray Dog Attack on Child: चार वर्षीय चिमुकल्याचे पिसाटलेल्या कुत्र्याने तोडले लचके, जळगावात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली!

जळगाव: भटक्या आणि पिसाटलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या (Stray Dogs Attack) घटना दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. एका बाजूला श्वानप्रेमी (Dog Lovers) भटक्या कुत्र्यांना होणारी मारहाण तसेच छळाविरुद्ध आवाज उठवत असताना, दुसरीकडे मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना होताना दिसून येत आहे. याच संदर्भात जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अंगणात खेळत असलेल्या एका चार वर्षीय चिमुकल्यावर पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना जळगावात घडली असून, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , हल्ल्यानंतर कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी त्याला रूग्णलयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. अरविंद सचिन गायकवाड (वय ४ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे.


अरविंदचे कुटुंब तो जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनी परिसरात राहणारे आहेत. अरविंद आपल्या अंगणात खेळत होता. खेळत असताना अचानक पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या पिसाळलेल्या कुत्र्याने अरविंदच्या चेहऱ्यावर, मानेला आणि गळ्याला खोल जखमा करत लचके तोडले.


कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात अरविंद रक्तबंबाळ झाला. कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तत्काळ अरविंदला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या आधीच त्याचा मृत्यू झाला.



पिसाळलेला कुत्रा आतापर्यंत ११ जणांना चावला


या घटनेनंतर परिसरात अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढत असून, याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यात आतापर्यंत ११ जणांनाही चावा घेतल्याचे समजते. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Comments
Add Comment

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

प्राजक्तानं नंदीवरुन घेतलेली एन्ट्री योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मुंबई : नुकताच स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा झाला.