संजीवनीच्या १५ विद्यार्थ्यांना सॅप कोर्समुळे झेन्सर टेक्नॉलॉजित संधी

कोपरगांव : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने सॅप (सिस्टिम अ‍ॅप्लिकेशनस् अँड प्रॉडक्ट्स ) या सॉफ्टवेअर कंपनीशी सामंजस्य करार (एमओयु) केलेला आहे. त्यामुळे या कोर्सचे प्रशिक्षण एका स्वतंत्र विभागामार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाते. तसेच संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग आपल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी संपर्क करतो. अशाच सॅप विभाग व टी अँड पी विभागाच्या संयुक्तिक प्रयत्नातुन झेन्सर टेक्नॉलॉजिज या कंपनीचे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यात कंपनीने अंतिम वर्षातील १५ विद्यार्थ्यांची चांगल्या वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.


झेन्सर टेक्नॉलॉजिज ही एक डिजिटल सोल्युशन्स आणि टेक्नॉलॉजी सर्विसेस कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असुन तिचे अस्तित्व जगभर आहे. या कंपनीने नोकरीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पयुटर इंजिनिअरींगच्या राजवर्धन विलास जाधव, सिध्दांत सुधाकर नवथर, श्रीजित पोपट पानगव्हाणे, वेदांत निवृत्ती गोर्डे, गौरी बाबासाहेब चांदर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रोहित दत्तात्रय बुळे, शंतनू गोरक्षनाथ ढोकळे, वैभव परशराम वेताळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या शुभांगी प्रमोद आहेर, अथर्वराज सुभाष चोरमुंगे, हर्षद अतुल देसाई, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगची स्नेहा बाळासाहेब शेळके, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या ऋतिका आण्णासाहेब जाधव, आकांक्षा अरूण कार्ले व शुभम आण्णासाहेब देवगिरे यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या