केंद्रीय मंत्री पियुष गोयल फ्रान्स दौऱ्यावर, इटलीला देणार भेट

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी 1 जून रोजी आपला फ्रान्सचा तीन दिवसांचा अधिकृत दौरा सुरू केला. हा दौरा 1 ते 5 जून दरम्यान होणाऱ्या फ्रान्स आणि इटलीच्या दौऱ्याचा एक भाग होता. गोयल यांची ही भेट प्रमुख युरोपीय भागीदारांसोबत धोरणात्मक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच मजबूत आणि समावेशक जागतिक विकासासाठी सामायिक दृष्टिकोन पुढे नेण्याप्रती भारताच्या अखंड वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.


फ्रान्समधील त्यांच्या दौऱ्यादरम्यान गोयल हे फ्रान्सचे अर्थव्यवस्था मंत्री एरिक लोम्बार्ड आणि फ्रेंच व्यापार मंत्री लॉरेंट सेंट-मार्टिन यांच्यासह फ्रेंच मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. भारत-फ्रेंच आर्थिक भागीदारी मजबूत करण्यावर तसेच व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधण्यावर या नेत्यांच्या चर्चा केंद्रित असतील.


फ्रान्सच्या उच्चस्तरीय भेटीचा एक भाग म्हणून, धोरणात्मक व्यावसायिक बैठका आणि कार्यक्रमांचा एक व्यापक अजेंडा निश्चित करण्यात आला आहे - या भेटीत विकॅट, टोटल एनर्जीज, लॉरियल, रेनॉल्ट, व्हॅलिओ, ईडीएफ आणि एटीआर सारख्या प्रमुख फ्रेंच कंपन्यांच्या वरिष्ठ सहभागी होतील, तसेच भारत-फ्रान्स व्यवसाय गोलमेज आणि भारत-फ्रान्स सीईओ फोरमचा समावेश असेल. या भेटीमुळे दोन्ही देशांतील आघाडीच्या उद्योग भागधारकांमध्ये संवाद वाढेल.


या भेटीचा एक भाग म्हणून गोयल प्रमुख आंतरराष्ट्रीय भागीदारांसह उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठकांची मालिका घेतील. यात युनायटेड किंग्डमचे व्यवसाय आणि व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स; सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि व्यापार आणि उद्योग मंत्री गान किम योंग; आणि सौदी अरेबियाचे वाणिज्य मंत्री डॉ. माजिद बिन अब्दुल्लाह अल-कसाबी यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, इस्रायलचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री नीर बरकत; नायजेरियाचे व्यापार, उद्योग आणि गुंतवणूक मंत्री डॉ. जुमोके ओडुवोले ओओएन; आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री मौरो लुईस आयकर व्हिएरा यांच्याशी देखील संवाद साधतील. धोरणात्मक आर्थिक सहकार्य वाढवणे आणि प्रदेशांमध्ये परस्पर फायदेशीर भागीदारी वाढवणे हे या संवादाचे उद्दिष्ट आहे. या संवादामुळे भारत-युनायटेड किंग्डम एफटीए वाटाघाटींना देखील महत्त्वपूर्ण चालना मिळेल.


प्रादेशिक गटांसोबत भारताच्या संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी, व्यापार आणि आर्थिक सुरक्षा, आंतरसंस्थात्मक संबंध आणि पारदर्शकता आयुक्त मारोश सेफकोविच तसेच कृषी आणि अन्न आयुक्त क्रिस्टोफ हॅन्सन यांच्यासह प्रमुख ईयू अधिकाऱ्यांसोबत गोयल यांच्या बैठका होणार आहेत. या बैठका द्विपक्षीय आणि बहुपक्षीय भागीदारी मजबूत करण्यासाठी तसेच जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीत एक महत्त्वाचा पक्ष म्हणून स्वतःला स्थान देण्यासाठी भारताच्या चालू प्रयत्नांना प्रतिबिंबित करतात.


फ्रान्समधील भेटी आणि बैठकांनंतर गोयल आपल्या परदेश दौऱ्याच्या पुढील टप्प्यासाठी इटलीला रवाना होतील.

Comments
Add Comment

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या

सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार

८० हजार कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या

छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी ईडीचे छापे

रायपूर : भारतमाला प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात झालेल्या अनियमिततांच्या