तनपुरे कारखाना अखेर तनपुरेंकडे...! १४ वर्षांनतर सत्तांतर, मोठ्या फरकाने पॅनेलची कूच

बाळकृष्ण भोसले (राहुरी ) : बहुचर्चित डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी (शरद पवार) चे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे प्रणित जनसेवा मंडळाचा चौदा वर्षांच्या प्रदिर्घ राजकीय वनवासानंतर २१ पैकी २१ जागा मिळवत कारखान्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळवले आहे. सभासद व कामगारांनी विश्वास दाखवत कारखान्याची सुत्रे तनपुरेंकडे सुपुर्द करत,चाक फिरविण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्यासमोर ठेवले आहे. बाजार समितीचे सभापती व मंडळाचे प्रमुख अरूण तनपुरे व रावसाहेब चाचा तनपुरे यांचा विजयी उमेदवारात समावेश आहे.


सकाळी ८ वाजता राहुरी शहराजवळील लोकनेते रामदास पा. धुमाळ महाविद्यालयात मतमोजणीस प्रारंभ झाला. निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार नामदेव पाटील यांच्या अधिपत्याखाली तसेच पोलिस निरिक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखालील तगड्या बंदोबस्तात मतमोजणीस सुरूवात झाली. मतदान बॅलेट पेपरवर असल्याने निकाल येण्यास उशीर होत होता. सर्वप्रथम ब वर्ग (उत्पादक बिगर उत्पादक व पणन सह.संस्था) मतदार संघाचा निकाल येत त्यातून जनसेवा मंडळाचे युवा नेते हर्ष अरूण तनपुरे यांनी १८७ पैकी १२८ मते मिळवून विजयश्री खेचून आणत जनसेवा मंडळाचे खाते उघडले.


तनपुरेंच्या जनसेवा पॅनेलच्या पहिल्याच जागेवरच्या झालेल्या विजयाने कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत नगर-महामार्गावर गुलालाची उधळण केली. त्यानंतर ग्रामीण भागातून कार्यकर्त्यांनी हळूहळू मतमोजणी केंद्राकडे कूच करत विजयाचा जल्लोष करण्यास सुरूवात केली तद्नंतर त्याचीच पुनरावृत्ती गटातून होत, कोल्हार खुर्द गटातून अशोक ज्ञानदेव उर्हे (७३२९) व ज्ञानेश्वर कोळसे (६९०९) विजयी घोषित करण्यात आले. तर देवळाली प्रवरा गटातून अरूण कोंडिराम ढुस (६८७४), कृष्णा नानासाहेब मुसमाडे (६७४७), भारत नानासाहेब वारूळे (६५५४) टाकळीमियाॅ गटातून मिना सुरेश करपे (७२३७), ज्ञानेश्वर बळीराम खुळे (७०८१), ज्ञानेश्वर हरी पवार (७०८१), आरडगाव गटातून प्रमोद रावसाहेब तारडे (६९८३), वैशाली भारत तारडे (६७११), सुनील भानुदास मोरे (६७८६) वांबोरी गटातून किसन कारभारी जवरे (७४२४), भास्कर जगन्नाथ ढोकणे (७३३३) राहुरी गटातून जनार्दन उर्फ गणेश लक्ष्मण गाडे (६६७४), अरूण बाबुराव तनपुरे (६९४७) अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून अरूण नानासाहेब ठोकळे (७२३६) महिला राखीव मतदार संघातून सपना प्रकाश भुजाडी (६७८६), जनाबाई धोंडीराम सोनवणे (६५६५) इतर मागास प्रवर्गातून रावसाहेब यादव तनपुरे (७१३७) प्रमुख उमेदवारात अरूण तनपुरे यांनी तब्बल अठ्ठावीसशे वर मतांची आघाडी घेतली.


मतदान केंद्रावर पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विजयाचे गणित मांडत आमचाच विजय होणार असल्याचे ठामपणे काल सांगितले होते. मतदान केल्यानंतरही त्यांच्या चेहर्यावर तसा विश्वास पहावयास मिळाला होता. तर विरोधी शेतकरी विकास मंडळाचे राजूभाऊ शेटे व कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ यांनीही विजयाचे गणित मांडले होते. मात्र साधारण दोन अडीच हजार मतांच्या फरकाने तनपुरे यांनी तब्बल १४ वर्षाच्या राजकीय वनवासानंतर कारखान्यावर आपला एकहाती झेंडा फडकावत सभासद कामागारांचा भरभक्कम विश्वास कमावला असल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. तालुकावासियांनीही राहुरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पारदर्शक नि शिस्तप्रिय कामाची पोचपावती म्हणून कारखान्याच्या सत्तेची चावी सभापती अरूण तनपुरे यांच्या हाती दिली असल्याचे पहावयास मिळाले आहे. यावेळी श्रीरामपुर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक बसवराज शिवपुजे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Comments
Add Comment

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.