जलसंपदा अभियंत्याच्या घरावर छापा; खिडकीतून फेकले नोटांचे बंडल

घरात सापडले तब्बल २ कोटी!


भुवनेश्वर : सरकारी नोकरशाहीतील भ्रष्टाचाराचे थरकाप उडवणारे चित्र ओडिशातील भुवनेश्वरमध्ये पाहायला मिळाले. जलसंपदा विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या बैकुंठनाथ सारंगी याच्या घरावर छापा टाकला असता, घाबरलेल्या सारंगीने थेट खिडकीतून रोख पैशांची बंडल बाहेर फेकण्याचा प्रकार घडला. ही घटना संपूर्ण परिसरात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून, या प्रकरणाचे थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.



ओडिशा राज्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने (Vigilance Department) बेहिशेबी संपत्तीप्रकरणी कारवाई करत सारंगीच्या अनेक ठिकाणच्या मालमत्तांवर एकाच वेळी छापे टाकले. त्याच्या भुवनेश्वरमधील फ्लॅटवर छापा पडताच, खिडकीतून पाचशे रुपयांची बंडले फेकताना तो रंगेहाथ सापडला. सतर्क अधिका-यांनी तातडीने ती रोख रक्कम हस्तगत केली.



छाप्यात उघड झालेला पैसा पाहून अधिकारीही थक्क झाले. घराच्या विविध भागांत लपवून ठेवलेली मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम, सोनं, मौल्यवान वस्तू आणि बँक खात्यांचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या तपासात तब्बल २ कोटी रुपयांहून अधिकचा बेहिशेबी साठा समोर आला असून, ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.





बैकुंठनाथ सारंगीच्या उत्पन्नाच्या तुलनेत त्याची संपत्ती संशयास्पदरीत्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक व्यवहारांची बारकाईने चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

अशी झाली जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे चोरी !

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना

कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात