पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श राज्यकर्त्या : थोरात

संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्याची सुकन्या असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे देशाच्या सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय क्षेत्रात मोठे योगदान असून सर्व जाती धर्माच्या जनतेला सोबत घेऊन पाण्याचे महत्त्व ओळखून जल व्यवस्थापनामध्ये मोठी क्रांती घडवणाऱ्या अहिल्यादेवी होळकर या देशातील आदर्श राज्यकर्त्या होत्या असे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.


संगमनेर मध्ये आशीर्वाद पतसंस्थेसमोर ३०० वी जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब ओहोळ, शंकरराव खेमनर, रणजितसिंह देशमुख, विश्वासराव मुर्तडक, रामहरी कातोरे, अर्चना बालवडे, रामदास धुळगंड, भास्कर शर्माळे,अण्णा राहिंज, इंद्रजीत खेमनर, तुकाराम दातीर, सचिन खेमनर, ॲड अशोक हजारे, माधव खेमनर ,गोविंद खेमनर ,ज्ञानेश्वर ढोले ,राहुल खेमनर ,चांगदेव खेमनर, हौशीराम वाघमोडे ,अनिल कांदळकर, अविनाश शिंदे, सुभाष हळनोर,एस एम खेमनर, भास्कर खेमनर, अण्णासाहेब कुदनर ,दीपक धुळगंड, ज्ञानेश्वर ढोणे सचिन राहींज राहुल खेमनर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाच्या राजकारणात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या इतिहासाचे अवलोकन करावे इतका अभिमानास्पद हा इतिहास आहे. भारतामध्ये ज्या महिला राज्यकर्त्या होऊन गेल्या त्यामध्ये आदर्श राज्यकर्त्या म्हणून पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांचा गौरव होतो.


मल्हारराव होळकर यांनी चौंडी येथील मुक्कामामध्ये अहिल्यादेवी यांना हेरले आणि आपली सून केली खंडेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींनी अत्यंत आदर्श पणे राज्यकारभार सांभाळला. पाण्याचे महत्व ओळखून गावोगावी विहिरी बंधारे बारव निर्माण केले दक्षिणेत रामेश्वर पासून उत्तरेत केदारनाथ आणि पश्चिमेला सुरटी सोमनाथ पासून आसाम पर्यंत विविध धार्मिक स्थळांवर त्यांनी घाट बांधले. चारीधाम बारा ज्योतिर्लिंग कुंभमेळ्याची चार ठिकाणी या ठिकाणी मंदिरे उभारली गावोगावी न्याय देण्याची व्यवस्था उभारली पोलीस प्रशासन धर्मशाळा पानवटे निर्माण केले.अत्यंत लोकाभिमुख कारभार करताना महिला सक्षमीकरणासाठी सती पद्धत बंद केली याचबरोबर महिलांना लष्करी शिक्षण दिले घोंगडीवर बसून कारभार करणाऱ्या अहिल्यादेवी यांनी २८ वर्षे यशस्वीपणे राज्यकारभार सांभाळताना आदर्श पद्धतीने निर्माण केली.या महापुरुषांच्या जीवनातून प्रत्येकाला प्रेरणा मिळाली पाहिजे यासाठी जयंतीनिमित्त वैचारिक व्याख्यानाचे आयोजन करणार असल्याचे ते म्हणाले.तर शंकर पाटील खेमनर म्हणाले की राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समानतेचा मंत्र दिला याच विचारांवर लोकनेते बाळासाहेब थोरात काम करत असून सर्व धर्म समभाव व मानवतेचा विचार त्यांनी कायम जोपासला असल्याचे ते म्हणाले.



याप्रसंगी अविनाश शिंदे ,प्रा गणेश गुंजाळ, अण्णासाहेब जगनर, प्राचार्य केजी खेमनर रामदास खेमनर शेखर सोसे दिनकर भगत सुभाष खेमनर बाळासाहेब गेटे रुपेश धुळगंड दादाभाऊ खेमनर यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड शंकरराव खेमनर यांनी केले सूत्रसंचालन ॲड अशोक हजारे व नामदेव कहांडळ यांनी केले तर अण्णासाहेब राहिंज यांनी आभार प्रदर्शन केले.

Comments
Add Comment

Deputy Chief Minister Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी’ फिरवणार?

अकार्यक्षम नेत्यांना दाखवणार घरचा रस्ता; मंत्र्यांपासून शाखाप्रमुखांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार होणार मुंबई :

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

मित्रानं वाढदिवसाला न बोलावल्यानं २४ वर्षीय तरुणानं जीवन संपवलं अन्...

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबफेळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणानं

Chief Minister Devendra Fadnavis : व्हिएतनामची महाराष्ट्रात ८.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; उद्योग विभाग आणि ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार मुंबई :

तब्बल १३ महिन्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर साताऱ्याच्या नीलमचा अमेरिकेत अखेरचा श्वास!

सातारा : नियतीचा क्रूर खेळ आणि साताऱ्याच्या लेकीने दिलेला लढा, अखेर दुर्दैवाने संपला आहे. कराड तालुक्यातील

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य