Onion Price Hike : महाराष्ट्रात कांदा महागणार? कापणीपूर्वी आलेल्या अवकाळीने केले नुकसान

साठवणुकीच्या अभावामुळे हजारो टन कांदा वाया, कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक


पुणे: ऐन मे महिन्यातील उन्हाळ्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यामुळे फळबागा आणि भाजीपाला उत्पादनावर त्याचा परिणाम झाला असून, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. कांदा कापणीपूर्वी आलेल्या अवकाळीने पीक संपूर्ण नष्ट झाले आहे. तसेच, पावसामुळे साठवणीच्या सोयीअभावी शेतात काढून ठेवलेला कांदाही खराब झाला. यामुळे हजारो टन कांदा कुजून गेल्यामुळे, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून भाव वाढीचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात कांदा महागण्याची दाट शक्यता आहे.



नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी


महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे आणि नाशिक जिल्हा प्रमुख जयदीप भदाणे यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या या पत्रात शेतकऱ्यांना प्रति एकर १ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय, ज्यांनी कांदा कापला मात्र साठवणुकीत खराब झाला, त्यांना प्रति क्विंटल २,००० रुपयांचे अनुदान मिळावे, असेही त्यांनी नमूद केले आहे. पत्रात म्हटले आहे की, ६ मेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव, नाशिक, धुळे, सोलापूर, बीड, पुणे, बुलढाणा, अकोला, परभणी, जालना आणि इतर जिल्ह्यांमध्ये कांद्याचे पीक कापणीपूर्वीच वाया गेले आहे.



नाफेडला पारदर्शक खरेदी करण्याचे आवाहन


संघटनेने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांना सुद्धा आवाहन केले आहे की, केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्यात यावा. ३ लाख टन कांदा ३,००० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करावा, अशी मागणी देखील केली आहे.



कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता


कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये बाजारात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मागणी कायम असताना पुरवठा घटल्यास भाव वाढतात, हे अलीकडच्या वर्षांत वारंवार दिसून आले आहे. सध्यातरी या विषयावर केंद्र किंवा राज्य सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


Comments
Add Comment

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्यास विरोध

मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी

कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून विठुरायाचे २४ तास दर्शन

सोलापूर : कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 'गोकुळ'चा नवा रेकॉर्ड, तब्बल इतके लाख दुधाची विक्री

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा

अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची - उदय सामंत

अमरावती : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे. त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील

नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल

कार्तिकी एकादशीला कोण करणार पंढरपूरला विठ्ठलाची पूजा, शिंदे की पवार?

सोलापूर : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात. राज्याला उपमुख्यमंत्री असले तर