Nashik Kumbh Mela: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तिन्ही आखाड्यांच्या महंतांनी केली 'ही' मागणी

नाशिक: पंचवटी तपोवन येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील मकवाना भवन येथे नाशिकच्या तीनही आखाड्यातील महंतांच्या उपस्थितीत काल दिनांक ३१ मे रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान साधुग्राम करता १५०० एकर जागा कायमस्वरूपी आरक्षित करण्याची मागणी महंत राजेंद्रदास महाराज यांनी केली आहे.


वैष्णव आखाड्यांच्या निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर या तिन्ही आखाड्यांच्या प्रमुख महंतांनी पत्रकारांशी काल संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीच्या पूर्वसंध्येला साधूनी काही महत्त्वाचे विषय सरकार पुढे केले आहेत.


यावेळी बोलताना राजेंद्रदास महाराज म्हणाले, अनादी काळापासून कुंभमेळ्याची परंपरा सुरू आहे. तीन आखाड्यांच्या अंतर्गत पुर्वी ४०० खालसे होते. आता त्यांची संख्या अकराशेपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे भविष्यात या खालस्यांची संख्या वाढणार असल्याने प्रशासनाने तपोवन व जवळच्या परिसरात पंधराशे एकर जागा आरक्षित करावी. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यात मुख्य तेरा आखाड्यांचा समावेश असतो, प्रशासनाने या तेरा आखाड्यांचा व्यतिरिक्त इतर कोणत्याही आखाड्यांबाबत विचार करू नये, असे देखील महंत राजेंद्रदास महाराज यांनी सांगितले.


महंत राजेंद्रदास यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भव्य, दिव्य कुंभमेळा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. हा कुंभमेळा करताना सनातन आणि धार्मिक परंपरांचे पालन व्हावे. त्याच्या परंपरा पाळल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



शाहीस्नान नव्हे तर अमृतस्नान म्हणा 


तत्कालीन मुघल आणि ब्रिटिश सरकारच्या राज्यात सोयीने कुंभमेळ्यातील स्नानाला शाही स्नान असे संबोधण्यात आले होते. आता सरकार बदलले आहे. सगळीकडे सनातन विचाराची सत्ता आहे. त्यामुळे शाही हे मुघल नाव न ठेवता भारतीय परंपरेला साजेशे अमृतस्नान असे संबोधले जावे. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात हा बदल करण्यात आला आहे, त्याचे पालन नाशिकला देखील व्हावे. अशी विनंतीदेखील त्यांनी केली.



गोदावरीच्या प्रदूषणावर काम करण्याची मागणी


दरम्यान प्रशासनाने कुंभमेळ्याची तयारी करताना रस्ते, पाणी यासह गोदावरीच्या प्रदूषणावर देखील काम करावे. प्रशासनाने नदी पात्रात मिसळणारे गटारीच्या पाण्याची स्वतंत्र पाईपलाईन करत गोदावरी प्रदुषण मुक्त करावी अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी अयोध्या येथून मुरलीधरदास महाराज, महानुपालदास महाराज, रामानंद महाराज, मोहनदास महाराज, शामसुंदरदास महाराज, दिगंबर आखाड्याचे रामकिशोरदास शास्त्री, महंत भक्तिचरणदास, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीष शुक्ल आदी साधुसंत, महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्नानाच्या तारखा जाहीर


दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली.  तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू आणि मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री तसेच नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रमुख सरकारी अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.

Comments
Add Comment

Honda India Power Products Q2 Results: होंडा इंडिया पॉवरचा तिमाही निकाल जाहीर निव्वळ नफ्यात थेट ३०.८०% वाढ

मोहित सोमण: होंडा इंडिया पॉवर प्रॉपर्टी लिमिटेडने आपला आर्थिक तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

महाराष्ट्र शासनाचे रत्ने व आभूषणे धोरण जाहीर

मुंबई : राज्य सरकारनं रत्ने आणि आभूषण उद्योगाला जागतिक स्पर्धेत आघाडीवर नेण्यासाठी राज्य शासनाने ‘रत्ने व

पर्यावरणवादी पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांचे निधन

वयाच्या ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : प्रसिद्ध पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट