शहापूरच्या सुजाताची गरुड भरारी

  35

शहापूर : शहापूर तालुक्यातील शिरगांव गावातील सुजाता रामचंद्र मडके हिची इंडियन रिसर्च सेंटर (इस्रो) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. सुजाताच्या संशोधनातून शहापूर तालुक्याचा झेंडा आता इस्रोमध्येही झळकणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाचा राजीनामा देऊन भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) बेंगलुर (कर्नाटक) येथे शास्रज्ञ (राजपत्रित अधिकारी) या पदावर सुजाता रुजू झाली आहे.

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण शिरगांव जिल्हा परिषद शाळेत झालेल्या सुजाताचा प्रवास प्रेरणादायी आहे. सुजाताने शहापूर येथील ग. वि. खाडे विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण करुन नंतर तिने (आयआयटी) खरगपूर येथे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या कार्यक्रमांतर्गत व्हच्र्युअल लॅब प्रोजेक्ट ३ मध्ये रिसर्च इंजिनिअर म्हणून काम केले आहे. त्यापुर्वी सुजाताची सहाय्यक अभियंता म्हणून महाजेन्को मध्ये निवड झालेली होती. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) मध्ये सायंटिस्ट बी पदाच्या मुलाखतीपर्यंत आणि भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी), ट्रॉम्बेच्या टेक्निकल ऑफिसर पदाच्या मुलाखतीपर्यंत तिने धडक मारलेली आहे. तसेच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश संपादन करुन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ठाणे येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत होती. दरम्यान नुकतेच ती भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), बेंगळुरूमध्ये सायंटिफिक ऑफिसर (एसओएससी) या पदावर रुजू झाली आहे.

इस्रोच्यावतीने सुजाताला मिळालेल्या संधीचा वडील म्हणून सार्थ अभिमान आहे. ग्रामीण भागात राहून केवळ प्रचंड मेहनत ,जिद्द व ध्येय बाळगल्यास निश्चित यशापर्यंत पोहोचता येते
असे सुजाताचे वडील रामचंद्र मडके यांनी म्हटले आले. निश्चितच शहापूरसाठी देखील ही अभिमानाची गोष्ट आहे.
मला इथंपर्यंत पोहोचता आले याचा मला आनंद आहे. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे होते. आई-वडिल माझ्यामागे ठामपणे उभे राहिले. त्यांनी केलेले संस्कार व मार्गदर्शन यामुळेच मला इस्रोपर्यंत पोहोचता आले.
- सुजाता रामचंद्र मडके
Comments
Add Comment

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या

सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

सहा वर्षे धूळ खात पडून भाईंदर : महिलांच्या मासिक पाळी काळात स्वच्छता वाढवण्यासाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध

दूषित पाण्यामुळे डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात

ठाणे  : डोंबिवली पश्चिमेतील गृहनिर्माण सोसायट्यांना दूषित व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असून, यामुळे नागरिक