Rinku Singh: केकेआरचा स्टार खेळाडू रिंकू सिंग पडला खासदारच्या प्रेमात, लग्नाची तारीखही ठरली!

टीम इंडियाचा आणि कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज रिंकू सिंग लवकरच अडकणार विवाह बंधनात 


मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू आणि सध्या आयपीएल २०२५ (IPL 2025) च्या हंगामाचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग (Rinku Singh) लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. रिंकू सपा खासदार प्रिया सरोज (MP Priya Saroj) यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.


सपा खासदार प्रिया सरोज आणि रिंकू सिंग यांच्या प्रेमाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. या दोघांचा साखरपुडा अन् लग्नसोहळ्याची तारीखदेखील निश्चित झाली आहे.



८ जूनला साखरपुडा तर १८ नोव्हेंबरला लग्न


8 जून रोजी रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम लखनऊमधील एका सेवन स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. तर रिंकू आणि प्रिया सरोज 18 नोव्हेंबर रोजी वाराणसीतील ताज हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचे समजते.



कोण आहेत प्रिया सरोज?


रिंकू सिंग भावी पत्नी प्रिया सरोज या उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील मछलीशहर मतदारसंघातून खासदार आहेत. 2024 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी समाजवादी पक्षाच्या बीपी सरोज यांचा 35850 मतांनी पराभव करून मोठा विजय मिळवला. प्रिया सरोजच्या वडिलांचे नाव तूफानी सरोज असून ते मछलीशहर मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. सध्या ते केरकत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Comments
Add Comment

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या