छोट्या नाल्यांची ६४ टक्के, तर मोठ्या नाल्यांची ९१ टक्के सफाई

  34

तुंबलेल्या प्लास्टिकमुळे महापालिकेपुढे मोठे आव्हान


मुंबई : दुसरीकडे सोमवारी आणि बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरांत झालेल्या जोरदार पावसामुळे छोट्या नाल्यांच्या सफाईत अडथळे निर्माण झाले आहेत. रस्ते, नाले यांच्याकडेला साफ केलेला कचरा तसेच उपसलेला गाळ पुन्हा नाल्यात गेला आहे. परिणामी छोट्या नाल्यांची सफाई वेळेत पूर्ण होऊ शकलेली नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.


सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसात नालेसफाईचे महापालिकेचे दावे वाहून गेले. नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार, ३१ मे रोजी डेडलाइन असतानाही आतापर्यंत मोठ्या नाल्यांची ९१ टक्के, तर छोट्या नाल्यांची ६४ टक्केच सफाई झाली आहे. रस्त्यांच्या कामातील डेब्रिज, वृक्ष छाटणी, रस्त्यावरील कचरा या नाल्यांमध्ये जमा झाला आहे. शिवाय आधीच घरगुती कचरा, प्लास्टिक यामुळे छोटे नाले तुंबले असून, त्यांची सफाई करणे एक मोठी डोकेदुखी असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागाने दिली.



पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ८० टक्के, पावसाळ्यादरम्यान आणि पावसाळ्यानंतर प्रत्येकी १० टक्के गाळ काढला जातो. मात्र नालेसफाईच्या डेडलाइनसाठी अवघे काही तास शिल्लक असताना आतापर्यंत एकूण ७४ टक्केच नालेसफाई झाली आहे. यात शहर, पश्चिम व पूर्व उपनगरे,
मिठी नदी आणि छोट्या नाल्यांचा समावेश आहे.


घनकचरा विभागाचा मदतीचा हात


छोट्या नाल्यांची सफाई लवकर व्हावी, यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाची मदत घेण्यात येणार आहे. विशेष स्वच्छता मोहिमेद्वारे पावसाळ्यात नदी, नाल्यांच्या परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील टाकाऊ वस्तूंचे संकलन, राडारोडा उचलणे, सर्वकष स्वच्छता केली जाणार आहे.



'श्वेतपत्रिका काढा'


राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी नालेसफाईच्या कामाच्या पाहणीनंतर नाराजी व्यक्त करताना या कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. मुंबईतील नाल्यांची पातमुखे ही भरती रेषेच्या खाली आहेत. त्यामुळे भरती आल्यानंतर सगळे पाणी जलवाहिन्यातून बाहेर रस्त्यावर फेकले जाते, परिणामी त्या भागात पाणी तुंबते. यावर पालिकेने काय उपाययोजना केल्या? किती पातमुखांची उंची वाढवून गेल्या २० वर्षांत ती वर आणली याची माहिती त्यांनी पालिकेकडे मागितली आहे.

Comments
Add Comment

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी