भारतात ३,३९५ अ‍ॅक्टिव्ह कोविड रुग्ण! केरळ पुन्हा आघाडीवर, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली : देशात सध्या एकूण ३,३९५ अ‍ॅक्टिव्ह कोविड रुग्णांची नोंद असून, गेल्या २४ तासांत चार मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जाहीर केले. या मृत्यूंपैकी प्रत्येकी एक मृत्यू दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि उत्तर प्रदेशात झाला आहे.


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या तपशीलानुसार, दिल्लीतील ७१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू न्यूमोनिया, सेप्टिक शॉक आणि ऍक्युट किडनी इंज्युरीमुळे झाला. कर्नाटकमधील ६३ वर्षीय पुरुष सेप्टिक शॉक, मल्टी ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम , न्यूमोनिया आणि ARDS यामुळे दगावले. केरळमध्ये ५९ वर्षीय पुरुष, ज्यांना हृदयविकार, टाइप-२ श्वसन विकृती, सेप्सिस, नव्याने ओळखलेला मधुमेह होता, त्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील २३ वर्षीय युवक, ज्यांना आधीपासूनच काही गंभीर आजार होते, त्यांचा एम्स ऋषिकेश येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.



कोविडचे प्रमाण सध्या कमी असले तरी केरळ, महाराष्ट्र, दिल्लीसह काही राज्यांत रुग्णसंख्येत वाढ दिसून येते. नागरिकांनी खबरदारी बाळगणे आणि प्रशासनाने नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.



राज्यानुसार अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी


🔸 केरळ – १,३३६
🔸 महाराष्ट्र – ४६७
🔸 दिल्ली – ३७५
🔸 गुजरात – २६५
🔸 कर्नाटक – २३४
🔸 पश्चिम बंगाल – २०५
🔸 तामिळनाडू – १८५
🔸 उत्तर प्रदेश – ११७
🔸 राजस्थान – ६०
🔸 पुडुचेरी – ४१
🔸 मध्य प्रदेश – १६


केंद्र सरकारने २ जूनपर्यंत तयारीचा अहवाल मागवला


देशात पुन्हा एकदा कोविड-१९ च्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्लीसह अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये ९०% पेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत.


२९ मे रोजी आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, सध्याच्या हवामानामुळे श्वसन संस्थेशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे, हे नमूद केले. त्यामध्ये इन्फ्लूएंझा, SARS-CoV-2, RSV यांसारख्या विषाणूंमुळे एक्यूट रेस्पिरेटरी इल्लनेस (ARI) चे प्रमाण वाढत आहे. सध्याचे ओमिक्रॉनचे JN.1, XFG, LF 7.9 व्हेरियंट सौम्य लक्षणांसह (उष्णता, खोकला, घसा खवखवणे) आढळत आहेत आणि अनेक प्रकरणे नैसर्गिकरित्या बरी होत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.



दिल्लीत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू


दिल्लीमध्ये काल कोविड पॉझिटिव्ह ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, हा सध्याच्या लाटेतील राजधानीतील पहिला मृत्यू आहे. ती महिला लॅप्रोटॉमीनंतर तीव्र आतड्यांच्या अडथळ्याने ग्रस्त होती. तर आज दिल्लीतील ७१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू न्यूमोनिया, सेप्टिक शॉक आणि ऍक्युट किडनी इंज्युरीमुळे झाला. कोविड निदान हे अपघाती स्वरूपाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, दिल्लीतील १९ कोविड रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, मात्र घाबरायचं कारण नाही. “दिल्ली सरकार सज्ज आहे आणि सर्व रुग्णालये तयारीत आहेत,” असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी