राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; तिघांचा मृत्यू

पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडा खडकोना परिसरात तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजता घडली आहे.




 

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई वाहिनीवर प्रवास करणाऱ्या प्रवासी कार चालकाने वाडा खडकोना गावाच्या हद्दीत समोर असणाऱ्या एका कंटेनरला जोरदार धडक दिली. यावेळी मागून येणाऱ्या अवजड वाहनाने कारला मागून धडक दिली. त्यामुळे अपघातग्रस्त कार दोन वाहनांच्या मध्ये चिरडल्या गेले. या घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात ग्रस्त वाहनात अडकलेल्या प्रवाशाला काढण्यासाठी परिसरातील नागरिकांना व पोलिसांना कटरचा वापर करावा लागला.



अपघाताच्या या घटनेत ग्लोरिया वलेस (७३), क्लायटोन वलेस (४३), फबोलिया वलेस (४५) या तिघांचा मृत्यू झाला आहे. मनोर पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात घडला असून मनोर पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

पहिल्या नऊ महिन्यातच मुंबईत रियल इस्टेट बाजारात चार पटीने गुंतवणूकीत वाढ! 'ही' आहे आकडेवारी

मुंबई: वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्याच नऊ महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण