अष्टविनायकाचा जीर्णोद्धार, विकासालाही मिळणार चालना

"गणपती बाप्पा मोरया!" महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा म्हणजे बाप्पा. आणि अष्टविनायक ही त्या भक्तीची, श्रद्धेची आणि परंपरेची सुंदर साखळी. अष्टविनायक यात्रेला जाणं म्हणजे केवळ मंदिरदर्शन नव्हे, तर अध्यात्मिक अनुभवांची एक अनोखी सफर आहे.आता ही यात्रा आणखी समृद्ध होणार आहे, कारण अष्टविनायक मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी तब्बल १४८ कोटींचा विकास आराखडा राज्य सरकारनं मंजूर केलाय. यामुळे काय बदलणार आहे, कोणत्या मंदिराला किती निधी मिळणार आहे, आणि भाविकांना काय नवे अनुभव मिळणार आहेत ...





गणपती म्हणजे विद्येची, बुद्धीची देवता. महाराष्ट्रात प्रसिद्ध अशी श्री गणेशांची आठ मंदिरे आहे. त्याला अष्टविनायक म्हटलं जातं. या आठ गणपतींना भेट दिल्यास दोन दिवसात अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, व लेण्याद्री येथे पाच गणपती आहेत. तर रायगड जिल्ह्यात महाड व पाली येथे दोन गणपती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सिद्धटेक इथं एक गणपती आहे. या अष्टविनायक मंदिरांचही रुपडं पालटणार आहे. कारण राज्य सरकारनं १८८ कोटींच्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि विकास आराखड्यालाही मान्यता दिली आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या धार्मिक वारशाचं जतन करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल पडलं आहे. तसेच आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.


अष्टविनायकांचा महिमा अपार आहे. या ठिकाणी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं येत असतात. भक्तांसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्यात. मंदिराचा जीर्णोद्धार, विद्युतीकरण, नुतनीकरण, नागरी सुविधा, मंदिर परिसरांचा विकास करण्यासाठी सुधारित विकास आराखडा तयार करण्यात आला. त्याला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी गती देण्याचे प्रयत्न केले. पुढं ६ मे २०२५ रोजी चौंडी येथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी मिळाली. काल, बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता विकास आराखड्याला अंतिम मंजुरी मिळालीय. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अष्टविनायक मंदिराच्या जीर्णोद्धाराला गती मिळणार असल्यानं स्थानिक नागरिक व भाविकांनी राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केलाय.



आता कोणत्या मंदिराला किती निधी देण्यात येणार आहे ते पाहूया...



  • श्री मयुरेश्वर मंदिर, मोरगाव (पुणे): ₹८ कोटी २१ लाख

  • श्री चिंतामणी मंदिर, थेऊर (पुणे): ₹7 कोटी 21 लाख

  • श्री विघ्नेश्वर मंदिर, ओझर (पुणे): 7 कोटी 84 लाख

  • श्री महागणपती मंदिर, रांजणगाव (पुणे): 12 कोटी 14 लाख

  • श्री वरदविनायक मंदिर, महाड (रायगड): २८ कोटी २४ लाख

  • श्री बल्लाळेश्वर मंदिर, पाली (रायगड): 26 कोटी 90 लाख

  • श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक (अहिल्यानगर): 9 कोटी 97 लाख


मंदिराच्या जीर्णोद्धार व्यतिरिक्त, विद्युतीकरण, प्रकाशयोजना, स्थापत्य सेवा आणि जीएसटी अशी एकूण ४७ कोटी ३९ लाख तरतूद करण्यात आली आहे. यामुळं हा एकूण खर्च १४७.८१ कोटींवर पोहोचला आहे.


अष्टविनायक मंदिरांचा विकास ही केवळ एक प्रशासकीय घोषणा नाही, तर तो महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या संवर्धनाचा मोठा टप्पा आहे. जीर्णोद्धारानंतर या मंदिरांना नवचैतन्य मिळेल, भाविकांची सोय-सुविधा वाढेल आणि धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे "श्रद्धा, पर्यटन आणि विकास" यांचा सुंदर संगम घडणार आहे.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना