Pune PMPML Bus : पुण्यातील बस प्रवास महागला, १० वर्षांनंतर PMPMLच्या बसभाड्यात दुपटीने वाढ, जाणून घ्या नवीन दर

पुणे : पुण्यातील बस प्रवास महागणार आहे . पुणेकरांना शहर वाहतूक सेवेच्या बसमधून प्रवास करताना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बससेवेच्या दरात येत्या १ जून पासून वाढ होणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सुधारित स्टेज रचनेनुसार नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे. दहा वर्षानंतर PMPMLच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे.


पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए कार्यक्षेत्रात बससेवा पुरवण्यात येते. या सेवेच्या प्रवास भाड्यात १ जून २०२५ पासून सुधारित स्टेज रचनेनुसार बदल करण्यात येत आहे. नव्या दरांची अंमलबजावणी पहाटेपासूनच सुरू होणार आहे.



महाराष्ट्र शासनाच्या ३१ मार्च २०१८ रोजीच्या राजपत्रानुसार, तसेच इतर परिवहन संस्थांच्या दरवाढीच्या धर्तीवर पीएमपीएमएलने प्रवासात सुसूत्रता येण्यासाठी स्टेज रचनेत बदल केला आहे. ५ ते १० किमी अंतरावर आधारित ११ स्टेज निश्चित केल्या आहेत. या रचनेनुसार १ किमी ते ८० किमीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. यास पीएमपीएमएलच्या संचालक मंडळ आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी मान्यता दिली आहे.



हे असणार नवीन दर



  • प्रवासाचे एकूण ११ टप्पे

  • एक ते ३० किलोमीटर अंतरासाठी दर ५ किलोमीटर अंतराने सहा टप्पे

  • ३० ते ८० किलोमीटरसाठी १० किलोमीटर अंतराने पाच टप्पे

  • ५ किलोमीटरसाठी १० रुपये

  • ५.१ ते १० किलोमीटर २० रुपये

  • १०.१ ते १५ किलोमीटर ३० रुपये

  • १५.१ ते २० किलोमीटर४० रुपये


पासमध्येही वाढ


बस प्रवासासोबत दैनंदिन आणि मासिक पासचे दरही वाढवण्यात आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये दैनंदिन पाससाठी पूर्वी ४० रुपये लागत होते. आता त्याला ७० रुपये लागणार आहे. पीएमआरडीए हद्दीत पाससाठी आता १२० रुपयांऐवजी १५० रुपये लागणार आहेत. तसेच मासिक पास ९०० रुपयांऐवजी १५०० रुपये लागतील. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सवलतीत बदल केला नाही.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना