खारेगाव नाका ते पाखाडीत महानगर गॅस वाहिनीमुळे चिखल रस्त्यावर

महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग कंपनी ठेकेदाराचे दुर्लक्ष


ठाणे :खारेगाव नाका ते पाखाडी भागात महानगर गॅस कंपनीच्या ठेकेदाराने गॅस वाहिनी टाकण्यासाठी खोदलेल्या वाहिन्यांमध्ये पाणी साठले असून त्यामधील काढलेली माती, दगड न उचलल्याने गेले दोन दिवस पडलेल्या पावसात या मातीचा चिखल झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे तर रस्त्याच्या कडेला बसणारे भाजीवाले व इतर गरीब फेरीवाल्यांना रस्त्यावर आपल्या धंद्यासाठी बसणे अवघड झाले आहे.


महानगर गॅस कंपनीच्या ठेकेदाराने ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी घेऊन काम सुरू केले, असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंपनी ठेकेदाराला पाऊस सुरू होण्याआधी माती व खोदलेली वाहिनी बुझवण्याची तंबी देणे आवश्यक असताना महापालिकेचे नियम गॅस कंपनी ठेकेदाराने धाब्यावर बसवले आहेत. त्यामुळे हा चिखल व या गटार वाहिनीतून कुजलेल्या कचऱ्यामुळे या रस्त्यावर घाणीचे ढीग साचले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून हा गाळ काढून टाकला असून संध्याकाळच्या वेळी येथे गाड्यांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होते तसेच त्यामध्ये डासांची पैदास होत आहे त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच गॅस कंपनीच्या ठेकेदाराने कळव्यातील जुना बेलापूर रस्त्यावरील शंकर मंदीर परिसरात ही रस्ते खोदून ठेवल्याने तेथे अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होते. नुकताच पाऊस पडल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या संतोष भोईर याची रिक्षा पलटी होऊन अपघात झाला तो रुग्णालयात उपचार घेत आहे.


रस्त्याच्या कडेला खोदलेल्या वाहिन्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना चालणे अवघड होत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे या खोदल्या वाहिन्या व रस्ते बुजवण्याची मागणी खारेगाव येथील माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी मागणी करून ही त्याकडे कळवा प्रभाग समितीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. या खोदलेल्या वाहिनी व रस्ते त्वरित बुझविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.


येत्या तीस तारखेपर्यंत कळवा प्रभाग समितीच्या हद्दीतील महानगर गॅस कंपनीच्या ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला खोदलेल्या वाहिन्या त्वरित बुजविण्याचे आदेश दिले असून न बुझविल्यास कारवाई केली जाईल.
- महेश अमृतकर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कळवा प्रभाग समिती


महानगर गॅस कंपनीच्या ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला खोदलेल्या वाहिन्या त्वरित बुजविण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते याकडे महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे त्यांना भेटून जाब विचारणार आहे.
- उमेश पाटील, माजी नगरसेवक, खारेगाव


या रस्त्यावर खोदलेली वाहिनी न बुझवल्याने आम्हाला रस्त्यावर बसावे लागते त्यामुळे आमचे नुकसान होत आहे"
- प्रेमकुमार मिश्रा, भाजी विक्रेता

Comments
Add Comment

विकासकामांना वेग; डोंबिवलीत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल; जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

मुंबई : डोंबिवली शहरातील काही भागात सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले

ठाण्यात पुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल; ३० एप्रिलपर्यंत काही मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

ठाणे : ठाणे शहराचा कायापालट केला जात आहे. त्यासाठी अनेक पुलांचे डागडुजीचे काम चालू आहे. त्यामुळे ठाणेकरांना

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे