जालिंदर सुपेकरांची गृहरक्षक दलात बदली

  43

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींना मदत करणारे पोलीस अधिकारी म्हणून जालिदर सुपेकर यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह विभाग जालिंदर सुपेकर यांची बदली करण्यात आली आहे. आता त्यांची नियुक्ती गृहरक्षक दलात उपमहासमादेशक या पदावर करण्यात आली आहे.

जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचा पती शशांक हगवणेचे मामा आहेत. हगवणे बंधुंना म्हणजेच शशांक आणि सुशील या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळत नव्हता. अखेर दोघांनी बनावट पत्त्याची कागदपत्रे तयार करुन पुणे शहर पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला. दोघांचे अर्ज मंजूर व्हावे यासाठी पडद्यामागून जालिंदर सुपेकर यांनीच हालचाल केली होती. तसेच कारागृह विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असताना सुपेकर यांनी कैद्यांसाठी खरेदी करायच्या वस्तूंच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह विभाग जालिंदर सुपेकर यांची गृहरक्षक दलात उपमहासमादेशक या पदावर बदली झाली आहे.

याआधी सुपेकरांकडे कारागृह विभागाच्या तीन अंतर्गत विभागांचा अतिरिक्त कारभार दिलेला होता. हा कारभार राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वीच काढून घेतला होता. आता त्यांची बदली करण्यात आली आहे. सुपेकर हे पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांची बदली करताना त्यांना त्यांच्या मूळ विभागात राज्य पोलीस दलात पाठवण्यात आलेले नाही. तसेच त्यांची पदावनती करुन त्यांना उप महासमादेशक पद देण्यात आले आहे.

शस्त्र परवान्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करुन फसवणूक केल्याप्रकरणी वैष्णवी हगवणेचा पती शशांक विरोधात वारजे आणि दीर सुशील विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी हेच फिर्यादी आहेत. पोलिसांनी शशांक आणि सुशीलचा शस्त्र परावाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांनी हगवणे कुटुंबाचा नातलग नीलेश चव्हाण याचाही शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शशांक, सुशील आणि नीलेश या तिघांचे शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे. नीलेशला नेपाळ सीमेजवळ अटक करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या