दहशतवादी कारवाई केली, तर ‘करारा जवाब’ देणार

पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा


कानपूर : पाकिस्तानच्या सैन्याला भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांमुळे मोठा धक्का बसला असून, त्यांनी युद्धविरामाची विनंती केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा वापर करून शत्रूच्या भूमीत घुसून दहशतवादी तळ नष्ट केले, या ऑपरेशनद्वारे भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून मोठे यश मिळवले आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. पाककडून कोणतीही दहशतवादी कारवाई झाली, तर त्याला ‘करारा जवाब’ दिला जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पाकिस्तानला दिला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे आयोजित सभेत शुक्रवारी ते बोलत होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत भारतीय लष्कराचे जोरदार कौतुक केले आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा विशेष उल्लेख करत, ही कारवाई भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचे प्रतीक ठरल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, ऑपरेशन सिंदूरने भारताच्या शत्रूंना हादरवून टाकले आणि ब्रह्मोससारख्या देशात तयार झालेल्या शस्त्रास्त्रांनी त्यांना झोप उडवली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांना आता भारताकडून कडक उत्तर मिळेल. कानपुरी भाषेत सांगायचे तर, शत्रू जिथे असेल, तिथे त्याला धडा शिकवला जाईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा वापर करून भारताने आत्मनिर्भरतेची प्रगती दाखवली आहे. ब्राह्मोस मिसाइल आणि इतर स्वदेशी शस्त्रास्त्रांनी शत्रूच्या भूमीत घुसून दहशतवादी तळ नष्ट केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.



भारताच्या शत्रूंना कठोर इशारा देताना मोदी म्हणाले, कोणीही भ्रमात राहू नये. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जे शरण येत होते, त्यांनी हे लक्षात ठेवावे की ऑपरेशन संपलेले नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय मुलींचा व बहिणींचा संताप कृतीमध्ये रूपांतरित झाला, हे जगाने पाहिले. आम्ही पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ शेकडो मैल आत घुसून उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर पाकिस्तान इतका हादरला की, संघर्ष थांबवण्यासाठी त्यांना विनवण्या कराव्या लागल्या.
मोदी पुढे म्हणाले की, भारताने तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत : प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला कडक प्रत्युत्तर दिले जाईल व त्यासाठी वेळ, पद्धत आणि अट या भारतीय लष्कराच्या हातात असतील. अणू युद्धाच्या धमक्यांना भारत घाबरणार नाही. दहशतवादी कारवाया घडवणारे मास्टरमाइंड व त्यांना मदत करणारी सरकारे या दोघांनाही सारखेच उत्तर दिले जाईल. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा जुनाच डाव भारत मान्य करणार नसल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.



मेक इन इंडियाचे कौतुक


मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाचे सामर्थ्य जगापुढे आले. मेक इन इंडियाअंतर्गत तयार झालेल्या आपल्या ब्रह्मोस मिसाईलने शत्रूच्या भूमीत घुसून अगदी नेमक्या ठिकाणी विध्वंस केला. एकेकाळी येथून पारंपरिक उद्योग निघून जात होते. पण आता मोठ्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्या इथे येत आहेत. जवळच अमेठीत एके-२०३ रायफलचे उत्पादन सुरू झाले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान शत्रूला झोप उडवणारी ब्रह्मोस मिसाईल – तिचा नवा पत्ता आता उत्तर प्रदेश आहे. काही लोक पाकिस्तानला खूश करण्यासाठी वक्तव्ये करत आहेत. अशा लोकांना माफ करणे योग्य आहे का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘दुर्दैवाने, काही लोकांच्या वक्तव्यांमुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर भ्रम निर्माण करण्याची संधी मिळते,’ असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या