Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘लोकराज्य'चा अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील विशेषांक प्रकाशित

अहिल्यानगर : अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘लोकराज्य’ च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि 'लोकराज्य'चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. अंकाच्या मुखपृष्ठावर जन्म त्रिशताब्दी निमित्ताने तयार करण्यात आलेले बोधचिन्ह आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य, त्यांचे महाराष्ट्रातील कार्य, धर्मपरायणता, समाजकार्य, राज्यकारभाराचा आदर्श, दातृत्व, त्यांनी उभारलेल्या विविध वास्तूंची माहिती अंकात देण्यात आली आहे.



चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्यात आयोजित या प्रकाशन सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार शिवाजी कर्डीले, आमदार नारायण पाटील, आमदार अमोल खताळ, आमदार चित्रा वाघ, आमदार काशिनाथ दाते, आमदार मोनिका राजळे, आमदार सुरेश धस, माजी आमदार अण्णासाहेब डांगे, माजी आमदार रमेश शेंडगे, प्रा.लक्ष्मण हाके, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.



अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी लिहिलेले लेख अंकात समाविष्ट आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसह शासनाने जन्म त्रिशताब्दी उत्सवानिमित्त घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती देखील या अंकात देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक