भारतात २०२४ - २५ मध्ये ८१.०४ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक

नवी दिल्ली : भारतात वेगाने विकास होत आहे. देशातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत आहे. सरकारने गुंतवणूकस्नेही धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे. भारतातील अनेक क्षेत्र आता १०० टक्के परदेशी गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. या सर्व प्रयत्नांचा फायदा होत आहे. भारतात २०२४ - २५ या एका आर्थिक वर्षात ८१.०४ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे.

देशात २०१३ - १४ मध्ये ३६.०५ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली होती. तिथून भारताने प्रगती करत २०२३ - २४ मध्ये ७१.२८ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक मिळवली. यानंतर २०२४ - २५ या एका आर्थिक वर्षात भारतात ८१.०४ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे.

देशात २०२४ - २५ या एका आर्थिक वर्षात झालेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी १९ टक्के गुंतवणूक सेवा क्षेत्रात झाली. त्याखालोखाल १६ टक्के गुंतवणूक कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात झाली. इतर व्यापारात आठ टक्के गुंतवणूक झाली. सेवा क्षेत्रातील गेल्या वर्षाच्या ६.६४ अब्ज अमेरिकन डॉलरच्या गुंतवणुकीत ४०.७७ टक्क्यांनी वाढ झाली. सेवा क्षेत्रात यंदा ९.३५ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. याआधी २०२३ - २४ मध्ये सेवा क्षेत्रात १६.१२ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली होती.

आर्थिक वर्ष २०२४ - २५ मध्ये देशात सर्वाधिक ३९ टक्के थेट परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. कर्नाटकमध्ये १३ टक्के, दिल्लीत १२ टक्के थेट परदेशी गुंतवणूक झाली. गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये सिंगापूरमधून सर्वात जास्त ३० टक्के, मॉरिशसमधून १७ टक्के, अमेरिकेतून ११ टक्के थेट गुंतवणूक भारतात झाली.

मागील अकरा वर्षात (२०१४ ते २०२५) देशात ७४८.७८ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. याआधीच्या अकरा वर्षांत (२००२३ ते २०१४) देशात ३०३.३८ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. देशामध्ये २००२३ ते २०१४ च्या तुलनेत २०१४ ते २०२५ या कालावधीत १४३ टक्के जास्त अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे.

मागील २५ वर्षात देशात १०७२.३६ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. यापैकी ७० टक्के थेट परदेशी गुंतवणूक २०१४ ते २०२५ दरम्यान देशत झाली आहे. भारतात थेट परदेशी गुंतवणूक करणाऱ्या देशांची संख्या २०१३ - १४ मध्ये ८९ होती ही संख्या २०२४ - २५ मध्ये ११२ झाली आहे.
Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत

PM Modi and Sukhbir Singh Badal Meeting : पंतप्रधान मोदी आणि सुखबीर सिंग बादल यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष (भाजप)