Bribe for 11th admission: अकरावी प्रवेशासाठी लाच घेणाऱ्या दोन शिक्षकांना रंगेहात पकडले, शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी!

जळगाव: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला (11 th Online Admission) सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी चक्क लाच (Bribe) मागितल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या दोन शिक्षकांनी अकरावी प्रवेशासाठी २० हजार रुपयांची मागणी केली होती. ज्यांना धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) सापळा रचून रंगेहात पकडले.


अकरावी प्रवेशासाठी 20 हजार लागतील, असे सांगत १० हजारांची रक्कम स्वीकारतांना संबंधित शिक्षकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. जळगाव येथे घडलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.

गुलाब विरभान साळुंखे व उल्हास भास्करराव बागूल अशी लाचखोर शिक्षकांची नावे आहेत. तक्रारदार हे मेहुणबारे येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या मेहुणबारे माध्यमिक विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाला आहे. त्यास याच संस्थेच्या मेहुणबारे उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी सायन्स या वर्गात प्रवेश घ्यावयाचा होता. याबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदार व त्यांच्या मुलाने २७ मे रोजी या शाळेत जाऊन तेथे उपशिक्षक गुलाब साळुंखे आणि लिपिक पंजाबराव देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी तक्रारदारांना त्यांच्या मुलाच्या प्रवेशाकरीता २० हजार रुपये द्यावे लागतील. त्यातील १० हजार रुपये ऑनलाईल अर्ज केल्यावर आणि उर्वरित १० हजार रुपये शाळेत प्रवेश घेतांना द्यावे लागतील. त्याशिवाय शाळेत प्रवेश होणार नाही, असे सांगितले होते.

Comments
Add Comment

MCCL : डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका!

डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप, तरुण कलाकारांसाठी सुवर्णसंधी

सुरेश वांदिले भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, रंगमंच, दृष्यकला, लोककला, पारंपरिक आणि देशी कला, सुगम

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

२०१० पासून टियर १ शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या किमतीत मोठी सुधारणा: कॉलियर्स

मुंबई: दिलेल्या नव्या अहवालातील माहितीनुसार, प्रमुख शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, परवडणाऱ्या

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान