२२ जिल्हाध्यक्षांची भाजपाकडून निवड

  37

अहिल्यानगर, नाशिक, पालघर, वसई-विरारसह मुंबईतील तीन जणांचा समावेश


मुंबई : राज्यातील रिक्त राहिलेल्या जिल्हाध्यक्षपदांसाठीची निवड भाजपाकडून जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून एकूण २२ नेत्यांकडे जिल्हास्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाकडून राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील अध्यक्षांची निवड करण्यात आली होती.


राज्यातील रिक्त राहिलेल्या जिल्हाध्यक्षपदांसाठीची निवड भाजपाकडून जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून एकूण २२ नेत्यांकडे जिल्हास्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाकडून राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील अध्यक्षांची निवड करण्यात आली होती. मात्र काही जिल्ह्यातील नावांची घोषणा करण्यात आली नव्हती, अखेर शनिवारी त्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मिळून एकूण २२ नेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.


भाजपाकडून शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्षांच्या यादीमध्ये पालघरच्या जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत, वसई-विरारच्या जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा पाटील, अहिल्यानगर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते, नाशिक शहरच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील केदार, नाशिक दक्षिणच्या अध्यक्षपदी सुनील बच्छाव, नाशिक उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी यतीन कदम, पुणे दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर वडणे, कोल्हापूर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.


बीडच्या शंकर देशमुखांकडे धुरा


गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश बारसागडे, चंद्रपूर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष कासमगुट्टवार, चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी हरिश शर्मा, वर्ध्याच्या जिल्हाध्यक्षपदी संजय गाते, परभणी ग्रामीणच्या शहराध्यक्षपदी सुरेश भुबंरे, छत्रपती संभाजीनगर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर शितोळे, तालुर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर, लातुर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी बसवराज पाटील, नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर देशमुख, नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी संतुकराव हंबर्डे, बीडच्या जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.


मुंबईतील उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य, दक्षिण मुंबईचेही जिल्हाध्यक्ष ठरले


मुंबईमधील तीन जिल्हाध्यक्षांची निवडही करण्यात आली असून, मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानमूर्ती शर्मा, दक्षिण मध्य मुंबईच्या अध्यक्षपदी निरंजन उभारे आणि दक्षिण मुंबईच्या अध्यक्षपदी शलाका साळवी यांची निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’