बेस्टने प्रवास करण्याचा विचार करताय? तर हे आधी वाचा

मुंबई (प्रतिनिधी) : बेस्ट उपक्रमाच्या बस ताफ्यात नवीन वातानुकूलित बसगाड्या सामील होत असून स्वमालकीच्या बसगाड्या भंगारात जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची मागणी पाहून बेस्टतर्फे काही बदल करण्यात आले आहेत. त्यात काही नवीन बसमार्ग सुरु करण्यात येत असून काही विद्यमान बस मागांच्या प्रवर्तनात बदल करण्यात येत आहेत. हे बदल १ जून पासून अमलात येणार आहेत. या अंतर्गत मंत्रालय ते दादलानी पार्क ठाणे दरम्यान आणि प्रतीक्षा नगर आगार ते पोर्तुगीज चर्च दरम्यान नवीन बसमार्ग सुरु करण्यात येणार असून काही बस मार्ग खंडित करण्यात येणार आहेत.


मंत्रालय ते बाळकूम दादलानी पार्क दरम्यान पूर्व मुक्त मागनि नवीन बसमार्ग ए ४९० सुरु करण्यात येणार असून या बसमार्गावर बस सकाळी ठाणे हुन ७. ३० ते ८. ०० वाजता सुटेल तर संध्याकाळी मंत्रालय हुन ५. ३० व ६ वाजता बस सुटतील. तर ए १७५ हि नवीन बस प्रतीक्षा नगर, अँटॉप हिल, वडाळा चर्च, दादर, प्लाझा, शिवाजी पार्क, पोतुगीज चर्च, कबुतरखाना, प्लाझा मार्ग वर्तुळाकार धावेल. बैंकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक दरम्यान धावणारी ए सी १० ही बस आता पी डि'मेलो मार्गे न जाता म्युझियम, हुतात्मा चौक, छ शिवाजी महाराज टर्मिनस, महात्मा फुले मंडई मेट्रो, काळबादेवी, भुलेश्वर, ने ने रुग्णालम, माझगाव मार्गे डॉकयार्ड रोड मार्गे शीव येथे जाईल. तर नेव्ही नगर ते चद्रि वसाहत दरम्यान धावणारी ११ मर्यादित्त आता भारतमाता उनणपुलामार्गे जाईल त्यामुळे या बसला आता लालबाग, जयहिंद व जिजामाता उद्यान हे थांबे नसतील. तर वरळी आगार ते वेसावे यारी रोड पर्यंत धावणारी ५६ क्रमांकाची बस फक्त रविवारी वातानुकूलित ए ५६ या क्रमांकाने धावेल, बँकचे आगार ते कुर्ला आगार रविवारपासून बेस्ट बसमार्गात बदल दरम्यान धावणारी ए २५ बस आता राणी लक्षमी बाई चौक पर्यंत धावेल तर सांताक्रूझ आगार ते ते गोराई आगार दरम्यान धावणारी बस ७९ क्रमांकाची बस चारकोप बस स्थानकापर्यंत धावेल.


अँटॉप हिल विस्तारित वे सिपन दरम्यान धावणारी १८१ हि बस मरोळ आगारापर्यंत तर माहीम ते मालवणी आगार दरम्यान धावणारी २४१ बस सांताक्रूझ आगारापर्यंत धावेल मुंबई सेंटर आगारातून शिवाजी नगर आगारासाठी सुटणारी ए ३५७ क्रमांकाची बस वसंतराव नाईक चौकातून सुटेल तर ट्रॉमबे ते मॅरेथॉन चौक ठाणे पर्यंत धावणारी ३९९ बस आता मुलुंड चेकनाका बस स्थानकातून सुटेल. माहीम ते मीरा रोड दरम्यान धावणारी सी ७५ बस आता मोरी मार्ग, रहेजा मार्ग टी जंक्शन मार्गे काळाकिल्ला आगारापर्यंत जाईल. मंत्रालय ते वरळी आगार दरम्यान धावणारी ए ८९ बस आता रविवारी धावणार नाही, तर वरळी आगार ते कुलाबा बस स्थानक दरम्यान धावणारी ए १२४ बस आता संपूर्ण आठवडा धावेल.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ