नवजात बाळावर जसलोक हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई : जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने एका दुर्मीळ आणि गंभीर प्रकरणात शस्त्रक्रिया आणि अतिदक्षता व्यवस्थापनाद्वारे ३० आठवड्यांच्या अकाली जन्मलेल्या १.३ किलोग्रॅम वजनाच्या आणि टाईप सी ट्रॅकिओ-इसोफॅजियल फिस्टुला या दुर्मीळ जन्मजात समस्येने ग्रस्त असलेल्या बाळावर यशस्वी उपचार केले. या जन्मजात समस्येमुळे श्वासनलिका आणि अन्ननलिकेमध्ये असामान्य जोड निर्माण होते, ज्यामुळे जास्त लाळ येणे, गुदमरणे तसेच फुफ्फुसांचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. वैद्यकीय टीमने एकाच टप्प्यातील शस्त्रक्रिया आणि नंतर इसोफॅजियल डायलटेशन केली. ही प्रक्रिया अशा नाजूक प्रकरणात प्रथमच यशस्वी झाली आहे. बहुविशेषज्ञ टीमच्या समन्वित प्रयत्नांमुळे बाळ आता स्थिर असून फक्त आईचे दूध घेत आहे. बाळाचे वजन १.८ किलो झाले आहे आणि लवकरच त्याला घरीपाठवण्यात येईल.


वापी, गुजरात येथे जन्मलेल्या या बाळाला या समस्येमुळे जीवघेण्या अडचणींना सामोरे जावे लागले. पालकांनी जसलोक हॉस्पिटलचे बालरोग विभागप्रमुख डॉ. फजल नबी यांच्याशी उच्चस्तरीय उपचारांसाठी संपर्क साधला. प्रकरणाच्या गंभीरतेचा विचार करून डॉ. नबी स्वतः वापीला गेले आणि बाळाला कृत्रिम श्वसनासह त्यांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे जसलोक हॉस्पिटलमध्ये आणले. बाळाला तत्काळ बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले, जिथे डॉ. फजल नबी यांनी उपचारांची जबाबदारी घेतली. त्यावेळी बाळ व्हेंटिलेटरवर होते, इनोट्रोप्ससह हेमोडायनामिक स्टॅबिलायझेशन करण्यात आले आणि सेप्सिसवरील उपचार सुरू करण्यात आले.



यानंतर प्रसिद्ध बालशल्यचिकित्सक डॉ. नार्गिश बारसिवाला यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली. त्यांनी बाळ स्थिर झाल्यावर एकाच टप्प्यातील शस्त्रक्रिया करणे उचित असल्याचे सांगितले. तिसऱ्या दिवशी, डॉ. बारसिवाला यांनी फिस्टुला लिगेशन आणि इसोफॅजियल अॅनास्टोमोसिससह वन-स्टेज करेक्टिव्ह सर्जरी केली. त्यानंतर बाळाला पुन्हा अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आले.शस्त्रक्रियेनंतरच्या काळात टीमला आतड्यांच्या हालचालींबाबत आणखी एक समस्याला सामोरे जावे लागले. प्रीमॅच्युरिटी आणि कमी वजनामुळे आतड्यांची हालचाल व्यवस्थित होत नव्हती. बाळाला एनजी ट्यूबद्वारे दूध देण्यात आले आणि काही प्रमाणात टोटल पॅरेन्टेरल न्यूट्रिशन दिले गेले. त्याला गिळण्यासही अडचण होत होती. साधारणतः एक महिना एनजी ट्यूबद्वारे फीड देण्यात आले आणि नंतर फीडिंग गॅस्ट्रोस्टोमीचा निर्णय घेण्यात आला व एनजी ट्यूब काढण्यात आली.


तथापि, एका महिन्यानंतरही बाळाला गिळण्यास अडचण येत होती. ही अडचण दूर करण्यासाठी गॅस्ट्रोस्टोमी प्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाच्या टीमने सर्वात छोटा उपलब्ध डायलटेर वापरून उच्च-जोखमीची इसोफॅजियल डायलटेशन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही नाजूक प्रक्रिया जसलोक हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सल्लागार डॉ. पंकज धवन यांनी पार पाडली.

Comments
Add Comment

भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि