Rupali Chakankar: महिला आयोग अध्यक्षपद राजीनाम्याच्या प्रश्नावर रुपाली चाकणकरांचं थेट उत्तर, “राजीनामा मागणं ही विरोधकांची भूमिकाच"

  86

पुणे: वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane Case) प्रकरणानंतर महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar Resignation) यांच्यावर राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांनी अखेर यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.


त्या म्हणाल्या, “राजीनामा मागणं ही विरोधकांची भूमिकाच असते. पंतप्रधान मोदींपासून गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा मागितला जातो”. त्या नाशिकमध्ये ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत जनसुनावणीसाठी उपस्थित होत्या. त्या दरम्यान त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.



"कुटुंब एकत्र ठेवणं हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे"


रुपाली चाकणकर म्हणाल्या, “कोणत्याही कुटुंबातून आलेल्या तक्रारीकडे आम्ही सामोपचाराने पाहतो. कुटुंब एकत्र ठेवणं हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. गैरसमज दूर करून संवाद साधणं आणि कायद्यानुसार तीन वेळा काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं.” त्या पुढे म्हणाल्या की, “कुटुंबव्यवस्था टिकवणं हेच आमचं काम आहे; तोडणं नव्हे, जोडणं गरजेचं आहे.”



परिणय फुके प्रकरणावर स्पष्टीकरण


परिणय फुके प्रकरणासंदर्भात चाकणकर म्हणाल्या की, “या प्रकरणात महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती. मात्र मीडियातून मिळालेल्या व्हिडिओंच्या आधारे नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून आम्ही चौकशीची मागणी केली आहे. पीडित महिलेशी चार ते पाच वेळा संपर्क केला गेला आहे. जेव्हा तक्रार येते, तेव्हा आयोगाकडून कारवाई केली जाते.”


त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “स्थानिक पोलीस स्टेशन, बरोसा सेल आणि कौटुंबिक न्यायालयात तक्रार दिल्यानंतर जर न्याय मिळत नसेल, तर महिला आयोग तुमच्यासाठी आहे. आम्ही सर्व तक्रारी गांभीर्याने घेतो आणि आवश्यक ती कारवाई करतो. तुम्ही पाठपुरावा करा, आयोग तुमच्या न्यायासाठी कटिबद्ध आहे.”

Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या