कल्याण-डोंबिवलीत वर्षभरात चौदा हजार नागरिकांना श्वानदंश

कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत दिवसेंदिवस भटक्या श्वानांचे प्रमाण वाढत आहे. या भटक्या श्वानांनी सन २०२४-२०२५ या वर्षभराच्या कालावधीत पालिका हद्दीतील १४ हजार २४८ नागरिकांना दंश केला आहे. मागील दोन वर्षाच्या कालावधीत कल्याण, डोंबिवली परिसरातील सुमारे ३६ हजारांहून अधिक नागरिकांना भटक्या श्वानांनी दंश केला आहे. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातून ही माहिती उपलब्ध झाली आहे.


कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत सुमारे ८० हजारांहून अधिक भटके श्वान आहेत. या भटक्या श्वानांच्या पिसाळल्याच्या, दंश करत असल्याच्या वाढत्या तक्रारी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडे आल्या की त्या श्वानांना पालिकेच्या निर्बिजीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण, लसीकरणच्या प्रक्रिया वेळोवेळी पार पाडण्यात येतात. रात्रीच्या वेळेत कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना ते पायी असताना, रिक्षा, दुचाकीवर असताना भटके श्वान त्यांच्या पाठीमागे लागून त्यांना दंश करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरांच्या काही भागातून रात्रीच्या वेळेत प्रवास करणे भटक्या श्वानांमुळे जोखमीचे झाले आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.



श्वान दंश झाल्यानंतर नागरिकांना पालिकेच्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयांमध्ये, आरोग्य केंद्रांमध्ये श्वान दंश प्रतिबंधित लस उपलब्ध करून देण्यात येते. सन २०२२-२०२३ मध्ये कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव परिसरातील १६ हजार ४१४ नागरिकांना श्वान दंश झाला. यामध्ये लहान बालकांचाही सहभाग आहे. २०२३-२०२४ मध्ये २० हजार ३९० नागरिकांना श्वान दंश झाला, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक कमलेश सोनवणे यांनी दिली. २०२४-२५ मध्ये १५ हजार ४४५ श्वानांवर निर्बिजीकरणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावर्षी ३९६ श्वानांना रेबिज झाले होते, असे आरोग्य निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले. खासगी दवाखान्यांमध्ये श्वान दंश उपचार घेतले तर एका इंजेक्शनसाठी सुमारे सातशे ते आठशे रूपये मोजावे लागतात. श्वान दंश झाल्यावर पालिकेत मोफत उपचार केले जातात. त्यामुळे बहुतांशी नागरिकांचा ओढा पालिकेत असतो, असे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.


भटक्या श्वानांवर निर्बिजीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी कल्याणमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ एक केंद्र आहे. येथे उपचाराच्या सर्व सुविधा आहेत. असेच एक केंद्र डोंबिवली एमआयडीसी भागात सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांना श्वान दंश झाल्यावर त्यांच्यावर जखमेप्रमाणे पालिका रुग्णालय, दवाखान्यांमध्ये तातडीने उपचार केले जातात.

Comments
Add Comment

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या