आषाढी एकादशीला 'या' वाहनांना टोलमाफी

मुंबई : वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल. वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील. लवकरच होणार असलेल्या आषाढी वारी संदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती. त्याविषयीची अधिक माहिती प्रसारमाध्यमांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

वारी मार्गातील अडथळे दूर केले जातील. पावसामुळे वारी मार्गाचे नुकसान झाले असेल तर आवश्यक ती डागडुजी तातडीने केली जाईल. वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून द्यावे. वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोल मध्ये सवलत द्यावी; असेही निर्देश राज्य शासनाने दिल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश राज्य शासनाने दिल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

वारीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल, पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पडाव्या, वारकऱ्यांचा खोळंबा होऊ नये यासाठी राज्य शासन आवश्यक ते नियोजन करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यंदाचे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे असे आहे वेळापत्रक

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक २०२५

१९ जून माऊली पालखी प्रस्थान आळंदी
२० जून आळंदी ते पुणे, २९ कि.मी
२१ जून पुणे मुक्काम
२२ जून पुणे ते सासवड, ३२ कि.मी
२३ जून सासवड मुक्काम
२४ जून सासवड ते जेजुरी, १६ कि.मी
२५ जून जेजुरी ते वाल्हे, १२ कि.मी
२६ जून वाल्हे ते लोणंद, २० कि.मी
माऊलींना निरास्मान
२७ जून लोणंद ते तरडगाव, ८ कि.मी
२८ जून तरडगाव ते फलटण, २१ कि.मी
२९ जून फलटण ते बरड, १८ कि.मी
३० जून बरड ते नातेपुते, २१ कि.मी
बरड येथे गोल रिंगण
१ जुलै नातेपुते ते माळशिरस, १८ कि.मी
सदाशिवनगर येथे गोल रिंगण
२ जुलै माळशिरस ते वेळापूर, १९ कि.मी
खुडूस येथे गोळ रिंगण
३ जुलै वेळापूर ते भंडी शेगाव, २१ कि.मी
ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा
४ जुलै भंडी शेगाव ते वाखरी, १० कि.मी
बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
५ जुलै वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
वाखरी येथे गोल रिंगण
६ जुलै देवशयनी आषाढी एकादशी
१० जुलै पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक २०२५

१८ जून : प्रस्थान आणि इनामदार वाड्यात मुक्काम
१९ जून :देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम
२० जून: आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम
२१ जून :निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम
२२ जून: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम
२३ जून :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम
२४ जून :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम
२५ जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम
२६ जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम
२७ जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )
२८ जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम
बेलवडी येथे पहिले गोल रिंगण
२९ जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम
इंदापूर येथे गोल रिंगण
३० जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम
१ जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम
निरास्मान आणि अकलूज येथे गोल रिंगण
२ जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम
माळीनगर येथे उभे रिंगण
३ जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम
४ जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम
बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
५ जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम
वाखरी येथे उभे रिंगण
६ जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
१० जुलै : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात
Comments
Add Comment

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.