Worli Mumbai Expensive Flat : काय सांगता खरंच! 'या' महिलेने मुंबईत डुप्लेक्ससाठी मोजले ६३९ कोटी रुपये?

 मुंबई : मायानगरी मुंबईत स्वत:चं घर असणं एक स्वप्न असतं. त्यासाठी आयुष्य खर्ची घालावं लागतं. मात्र काही जण आपल्या मेहनतीच्या बळावर अनेक घरं खरेदी करतात. मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलंय. त्याला कारण आहे यूएसव्ही लिमिटेडच्या चेअरपर्सन लीना गांधी तिवारी यांनी चक्क ६३९ कोटी मोजत मुंबईच्या समुद्रकिनारी केलेली डुप्लेक्सची खरेदी. तर चला, जाणून घेऊया या रेकॉर्ड-ब्रेकिंग डीलमागील कहाणी...


मायानगरी आणि स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत घर घेताना आयुष्य वेचावं लागतं. एक घर असलं तरी कोट्यधीश असल्यासारखं वाटतं. मुंबईत आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती आहेत आणि मुंबईच्या समुद्रकिनारी लक्झरी घरंही आहेत. मुंबईत अशा ठिकाणी घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. याच मुंबईतल्या वरळी परिसरात USV कंपनीच्या चेअरपर्सन लीना गांधी तिवारी यांनी दोन अल्ट्रा लक्झरी डुप्लेक्स खरेदी केले आहेत. नामन झाना या ४० मजली रेसिडेन्शियल टॉवरमध्ये लीना गांधी तिवारी यांनी या दोन डुप्लेक्ससाठी तब्बल ६३९ कोटी रुपये मोजले आहेत. म्हणजेच प्रतिचौरस फुटासाठी त्यांनी २.८३ लाख रुपये दिले आहेत. यामुळे हा भारतातील सर्वात महागडा रेसिडेन्शियल डील ठरलाय. लीना गांधी तिवारी यांनी खरेदी केलेल्या या दोन डुप्लेक्सचा एकूण पसारा आहे तो २२,५७२ चौरस फुटांचा. तोही ३२व्या ते ३५व्या मजल्यावर. या डीलसाठी तब्बल ६३.९ कोटी रुपयांचे स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी भरावा लागलाय. एकूण हा व्यवहार 700 कोटींच्या घरात गेला आहे. हाही एक रेकॉर्डच आहे.


Worli Mumbai Expensive Flat

लीना गांधी तिवारी नेमक्या आहेत तरी कोण?



वरळी हा मुंबईचा हब


लीना गांधी तिवारी या उद्योजिका आहेत आणि यूएसव्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या चेअरपर्सन आहेत. यूएसव्ही ही एक आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी आहे. जेनेरिक औषधे आणि इतर आरोग्य उत्पादनांमध्ये ही कंपनी टॉपमध्ये आहे. तिवारी या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. त्यांचा लक्झरी डुप्लेक्स खरेदीचा निर्णय मुंबईतील लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमधील वाढत्या मागणीचं प्रतीक मानलं जातंय. ही डील इतकी खास का आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे. लीना गांधी तिवारी यांनी ६३९ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या डुप्लेक्समुळे मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये नवीन मापदंड प्रस्तापित केलाय. वरळी हा आता मुंबईचा लक्झरी हब बनलाय. या वरळीत प्रीमियम प्रॉपर्टीजची मागणी सतत वाढतेय. नामन झाना टॉवर त्याच्या आधुनिक सुविधांसाठी आणि समोर दिसणाऱ्या समुद्राच्या अप्रतिम दृश्यांसाठी ओळखला जातो. यात चौवीस तास सिक्युरिटी, स्विमिंग पूल, क्लब हाऊस आणि खास लिफ्ट्स यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. अशा मोठ्या डीलमुळे मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटला आणखी चालना मिळेल.


वरळी, बांद्रा आणि लोअर परेल यासारख्या प्राईम लोकेशन्समध्ये लक्झरी प्रॉपर्टीजची मागणी वाढत आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. याशिवाय या डीलमुळे स्टॅम्प ड्युटीच्या स्वरूपात सरकारी तिजोरीतही मोठा महसूल जमा झालाय. लीना गांधी तिवारी यांचा हा रेकॉर्ड-ब्रेकिंग डील मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये 'लक्झरी' ठरलाय. वरळी आता फक्त एक ठिकाण नाही तर एक स्टेटस सिम्बॉल बनली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Rain : मुंबईत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७६ टक्के पडला पाऊस

मुंबई : मुंबईत (Mumbai) आतापर्यंत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७५ ते ७६ टक्के एवढ्या पावसाची (Rain) नोंद झाल्याची आकडेवारी

BMC Schools : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ८० टक्के शालेय साहित्याचे वाटप

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळांमध्ये (Schools) शालेय विद्यार्थ्यांना (Students) दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तुंचे मोफत वाटप

BMC : तब्बल १२७८ महिलांमध्ये स्तन कर्करोगाची आढळली लक्षणे, महापालिकेच्यावतीने केला जाणार मोफत उपचार

महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली माहिती मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री

Mumbai Water Supply : मुंबईकरांचा पाणी साठा सुस्थितीत, आता प्रतीक्षा ऑगस्टमधील पावसाची

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या सर्व धरणांमधील पाणी साठा आता चांगल्याप्रकारे वाढू लागला असून

Ashadhi Ekadashi : वडाळा येथील 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते महापूजा आणि महाअभिषेक संपन्न

मुंबईकरांच्या सुख-समृद्धीसह महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना वडाळा : आषाढी

Amravati : राज्यात खरीप पेरण्यांना वेग; २० जुलैअखेर ७४ टक्के पेरणी पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर

मुंबई : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने