Worli Mumbai Expensive Flat : काय सांगता खरंच! 'या' महिलेने मुंबईत डुप्लेक्ससाठी मोजले ६३९ कोटी रुपये?

 मुंबई : मायानगरी मुंबईत स्वत:चं घर असणं एक स्वप्न असतं. त्यासाठी आयुष्य खर्ची घालावं लागतं. मात्र काही जण आपल्या मेहनतीच्या बळावर अनेक घरं खरेदी करतात. मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलंय. त्याला कारण आहे यूएसव्ही लिमिटेडच्या चेअरपर्सन लीना गांधी तिवारी यांनी चक्क ६३९ कोटी मोजत मुंबईच्या समुद्रकिनारी केलेली डुप्लेक्सची खरेदी. तर चला, जाणून घेऊया या रेकॉर्ड-ब्रेकिंग डीलमागील कहाणी...


मायानगरी आणि स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत घर घेताना आयुष्य वेचावं लागतं. एक घर असलं तरी कोट्यधीश असल्यासारखं वाटतं. मुंबईत आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती आहेत आणि मुंबईच्या समुद्रकिनारी लक्झरी घरंही आहेत. मुंबईत अशा ठिकाणी घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. याच मुंबईतल्या वरळी परिसरात USV कंपनीच्या चेअरपर्सन लीना गांधी तिवारी यांनी दोन अल्ट्रा लक्झरी डुप्लेक्स खरेदी केले आहेत. नामन झाना या ४० मजली रेसिडेन्शियल टॉवरमध्ये लीना गांधी तिवारी यांनी या दोन डुप्लेक्ससाठी तब्बल ६३९ कोटी रुपये मोजले आहेत. म्हणजेच प्रतिचौरस फुटासाठी त्यांनी २.८३ लाख रुपये दिले आहेत. यामुळे हा भारतातील सर्वात महागडा रेसिडेन्शियल डील ठरलाय. लीना गांधी तिवारी यांनी खरेदी केलेल्या या दोन डुप्लेक्सचा एकूण पसारा आहे तो २२,५७२ चौरस फुटांचा. तोही ३२व्या ते ३५व्या मजल्यावर. या डीलसाठी तब्बल ६३.९ कोटी रुपयांचे स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी भरावा लागलाय. एकूण हा व्यवहार 700 कोटींच्या घरात गेला आहे. हाही एक रेकॉर्डच आहे.


Worli Mumbai Expensive Flat

लीना गांधी तिवारी नेमक्या आहेत तरी कोण?



वरळी हा मुंबईचा हब


लीना गांधी तिवारी या उद्योजिका आहेत आणि यूएसव्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या चेअरपर्सन आहेत. यूएसव्ही ही एक आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी आहे. जेनेरिक औषधे आणि इतर आरोग्य उत्पादनांमध्ये ही कंपनी टॉपमध्ये आहे. तिवारी या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. त्यांचा लक्झरी डुप्लेक्स खरेदीचा निर्णय मुंबईतील लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमधील वाढत्या मागणीचं प्रतीक मानलं जातंय. ही डील इतकी खास का आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे. लीना गांधी तिवारी यांनी ६३९ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या डुप्लेक्समुळे मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये नवीन मापदंड प्रस्तापित केलाय. वरळी हा आता मुंबईचा लक्झरी हब बनलाय. या वरळीत प्रीमियम प्रॉपर्टीजची मागणी सतत वाढतेय. नामन झाना टॉवर त्याच्या आधुनिक सुविधांसाठी आणि समोर दिसणाऱ्या समुद्राच्या अप्रतिम दृश्यांसाठी ओळखला जातो. यात चौवीस तास सिक्युरिटी, स्विमिंग पूल, क्लब हाऊस आणि खास लिफ्ट्स यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. अशा मोठ्या डीलमुळे मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटला आणखी चालना मिळेल.


वरळी, बांद्रा आणि लोअर परेल यासारख्या प्राईम लोकेशन्समध्ये लक्झरी प्रॉपर्टीजची मागणी वाढत आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. याशिवाय या डीलमुळे स्टॅम्प ड्युटीच्या स्वरूपात सरकारी तिजोरीतही मोठा महसूल जमा झालाय. लीना गांधी तिवारी यांचा हा रेकॉर्ड-ब्रेकिंग डील मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये 'लक्झरी' ठरलाय. वरळी आता फक्त एक ठिकाण नाही तर एक स्टेटस सिम्बॉल बनली आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व

मुंबईत अर्धवट राहिलेल्या ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात, १५० कामे अद्याप थांबलेलीच

मुंंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अर्धवट कामांना आता

मुुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर धारावी प्रकल्पाचे होणार कास्टींग यार्ड?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या

Rain Update : 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha)

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक