मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले. जलदगतीने मुंबईत रेल्वेचं जाळं तयार झालं त्यामुळे मुंबईकरांचा तसेच पर्यटकांचा प्रवास हा सुखकर झाला. आता मुंबईच्या लोकलचा आणखी कायापालट होणार आहे.



कशी असेल वंदे मेट्रो लोकल सेवा ?


मुंबईच्या लोकलचा चेहरा बदलण्यात वंदे मेट्रोची साथ मिळणार असल्याने वंदे मेट्रो लोकल या नावाने ती लोकल ओळखण्यात येणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ याने मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कसाठी २,८५६ वंदे मेट्रो डब्यांची खरेदी करणार आहे . यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा आता आणखी सुसाट आणि आधुनिक आणि सुरक्षित होणार आहे.


मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) टप्पा ३ आणि ३-A अंतर्गत एकूण २३८ वंदे मेट्रो एसी लोकल गाड्या घेतल्या जातील. प्रत्येक गाडी १२ डब्यांची असेल. या गाड्यांमध्ये 'वॉक-थ्रू' डिझाइन असेल, ज्यामुळे प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकतील आणि गर्दीचे विभाजन होईल. तसेच आरामदायी कुशन सीट्स, दिव्यांगांसाठी विशेष जागा आणि मोठ्या खिडक्या असतील.स्वयंचलित दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरे, धूर आणि आग शोधणारी यंत्रणा आणि आपत्कालीन टॉक - बॅक सिस्टिम असेल. मुंबईच्या हवामानाचा आणि पावसामुळे खोळंबा होणाऱ्या रेल्वेसेवांचा विचार करता वंदे मेट्रो लोकल वॉटरप्रूफ आणि गंज - रोधक बनवल्या जाणार आहेत.



अत्याधुनिक सोयीसुविधा, यात कशाचा समावेश असेल ?


यूएसबी चार्जिंग पॉईंट, वाय-फाय सुविधा, डिजिटल रूट मॅप यांसारख्या अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.



मुंबईकरांना या सेवेचा लाभ केव्हापर्यंत मिळणार ?


मिळालेल्या माहितीनुसार अडीच वर्षात पहिली 'प्रोटोटाइप' गाडी येण्याची शक्यता आहे, आणखी काही यशस्वी चाचण्या झाल्यांनतर ४ ते ६ वर्षात पूर्ण गाड्यांचा पुरवठा केला जाणार आहे.


मेक इन इंडिया या मोहिमेचा मुंबई लोकल ही एक भाग असून वंदे मेट्रो गाड्यांमुळे मुंबईतील लोकल प्रवासाचा दर्जा हा वाढणार असून प्रवाशांना आत जागतिक दर्जाचा अनुभव मिळणार आहे.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा