थकबाकीदारांच्या मालमत्तांची अटकावणी केल्यानंतर थेट लिलाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची भरणा नियोजित वेळेत न करणाऱ्या मालमत्तांची वसुली करण्यासाठी मालमत्ता जप्तीची नोटीस बजावून अटकावणी केली जाते . मात्र, आता मालमत्ता अटकावणी केल्यानंतर जागेचे सिमांकन, प्रॉपर्टी कार्ड तसेच आदींची माहिती गोळा करून कारवाई करण्याची गरज नसून या प्रक्रिया न होताही महापालिकेच्यावतीने कर भरलेल्या आणि अटकावणी केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे निर्देश प्रशासनाच्यावतीने अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. यामुळे अटकावणी केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी अनेक जाचक अटी व शर्तींची पुर्तता करण्यास लागणारा विलंब कमी टाळण्यासाठी आणि लिलावाची प्रक्रिया जलद करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे .


मुंबई महापालिकेच्यावतीने करनिर्धारण आणि संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी घेवून मार्च अखेरपर्यंत निश्चित केलेली मालमत्ता कराची वसूली करण्याचे निर्देश आढावा बैठकीत दिले. या बैठकीमध्ये मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांच्या अटकावणी केलेल्या आणि लिलाव न झालेल्या प्रकरणाची माहिती घेण्यात आली. यामध्ये अटकावणी केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यापूर्वी येत असलेल्या अडचणींच्या बाबी अधिकाऱ्यांच्या वतीने मांडण्यात आल्या. त्यानंतर प्रशासनाच्यावतीने यापूर्वीच्या अटींमध्ये अडकून न पडता लिलावाची प्रक्रिया केली जावी अशाप्रकारचे निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे.


दीर्घ कालावधीपासून कर न भरणाऱ्या मालमत्तांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात यावी. तसेच, थकबाकीदारांना प्रचलित नियमानुसार नोटिसा बजावणे, दंड व व्याजाची आकारणी करणे आणि आवश्यकतेनुसार मालमत्तांवर जप्ती अथवा लिलावाची कारवाई राबविण्यात यावी. कायदेशीर कारवाईच्या संदर्भात सर्व प्रक्रिया स्पष्ट, पारदर्शक व कालमर्यादेत पूर्ण करण्यात याव्यात, असे निर्देश डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.


या बैठकीत चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची १०० टक्के वसुली सुनिश्चित करण्यात यावी. मालमत्तेचे क्षेत्रफळ, वापर व मालकीविषयक माहिती तातडीने अद्ययावत करून नव्याने करयोग्य ठरणाऱ्या मालमत्तांचा करजाळ्यात समावेश करण्यात यावा. प्रभागनिहाय , विभागनिहाय मोठ्या थकबाकीदारांची स्वतंत्र वर्गवारी करून त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे. असेही निर्देश डॉ जोशी यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची