अरे बापरे! सलग दोन महीने ४० वर्षीय महिलेला साखळदंडाने बांधून ठेवलं; कोल्हापूरमध्ये पोलिसांनी केली सुटका

कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कोल्हापुर येथील राजारामपुरमध्ये ४० वर्षीय महिलेला तब्बल २ महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवल्याची माहिती समोर आली आहे.  सदर महिला तिच्या भाच्याकडे राहत असून गेल्या दीड ते 2 महिन्यांपासून तिला बांधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


कोल्हापूरच्या राजारामपुरी इथं एका महिलेला सलग दोन महीने साखळ दंडाने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला? याबाबत तुर्तास माहिती मिळालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांचे क्राइम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला साखळदंडातून मुक्त केलं आहे. सारिका साळी (40) असं या महिलेचं नाव असून पोलिसांकडून महिलेची सुटका करण्यात आली आहे.



महिलेची मानसिक अवस्था खराब 


सारिका साळी या महिलेची मानसिक अवस्था चांगली नसून, रस्त्यावर फिरताना ती काहीही उचलून घेते आणि खाण्याचा प्रयत्न करते, म्हणून तिच्यासमवेत असे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली  आहे. पोलिसांनी कुलूप खोलणाऱ्या व्यक्तीला बोलावून महिलेला सांखळदडांतून मुक्त केले आहे. या महिलेला का बांधून ठेवलं याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, त्यादृष्टीने पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. मात्र, पोलिसांनी महिलेची सुटका केल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत. सदर महिला तिच्या भाच्याकडे राहते. दरम्यान या घटनेचा तपास सुरू असून, याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत असून अटकही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले असून संबंधित महिलेची सुटका करुन आरोपींवर कारवाईची मागणी त्यांच्याकडून होत आहे.

Comments
Add Comment

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.