वैष्णवी आत्महत्या प्रकरण : पती, सासू आणि नणंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यापूर्वी तिघांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र तपास पूर्ण झाल्याचे कारण देत आता त्यांना येरवडा कारागृहात पाठवण्यात येणार आहे.


वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील तिघा आरोपींना शिवाजीनगर कोर्टात हजर केल्यानंतर, पोलीस तपास पूर्ण झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. पोलिसांनी सुनावणीत पोलीस कोठडीची मागणी केली नाही. गरज पडल्यास आम्ही कोठडी मागू असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. त्यानुसार या तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. ती मिळताच सासू आणि नणंद दोघींनी जामीन अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. याआधी दोन वेळा पोलीस कोठडी घेण्यात आली होती. आता सध्या मात्र न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे तिघांना येरवडा कारागृहात ठेवण्यात येणार आहे.


दरम्यान, या प्रकरणात फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा बनावट फोन करणाऱ्या संतोष दत्तात्रय गायकवाड या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. फोन नंबरच्या आधारे लोकेशन शोधून त्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वैष्णवी हगवणे हिचे वडील अनिल कस्पटे म्हणाले की, "निलेश चव्हाण हा देखील या संपूर्ण कटात सहभागी होता. त्या दिवशी तो तिथेच होता," असा दावा अनिल कस्पटे यांनी केला आहे. पोलिसांनी आता निलेश चव्हाणचा शोध अधिक गतीने सुरू केला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नव्या घडामोडी समोर येत आहेत. पोलिस तपास वेग घेत आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया पुढे सरकत आहे. या प्रकरणात न्याय मिळावा, अशी अपेक्षा वैष्णवीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणात शितल तेजवानींची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली पाच तास चौकशी!

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या फर्मशी संबंधित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात पुणे

धक्कादायक! नाशिकनंतर पुण्यातही चिमुकलीवर अत्याचार, ऊसतोड कामगाराचे अमानुष कृत्य

पुणे: नाशिकच्या मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येचा विषय ताजा असतानाच, पुण्यातून एक बातमी समोर आली

पुण्यात म्हाडाची मोठी घोषणा; ४ हजारांहून अधिक घरांसाठी वाढीव मुदत

पुणे : पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे,

पुणे गृहनिर्माण मंडळातर्फे करण्यात येणाऱ्या सदनिका सोडतीच्या अर्जाची मुदत वाढली

पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व

४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी

८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मुंबई : राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण

राज्यातील फार्मसी अभ्यासक्रमांच्या यंदाही २५ ते ३० टक्के जागा रिक्त

मुंबई  : कोरोना महामारीत फार्मसी उद्योगाला मिळालेल्या महत्त्वामुळे या क्षेत्रातील अभ्यासक्रमांची लोकप्रियता