रस्ते, गल्लीबोळांची होणार स्वच्छता

मुंबई : मुंबईतील नदी आणि नाल्यांमध्ये पावसाळ्यात आसपासचा कचरा वाहून पुन्हा नाल्यांमध्ये जात असल्याने हा सर्व कचरा आणि राडारोडा उचलण्याची मोहिम आता महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून नदी, नाल्यांच्या परिसरातील स्वच्छतेवर या मोहिमेद्वारे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. रस्ते, गल्ली–बोळ यांची स्वच्छता, पेव्हर ब्लॉक, कडेचे दगड (कर्बस्टोन), नाले व पर्जन्य जलवाहिनीच्या इनलेट पॉईंट्सवरील जाळ्यांची स्वच्छता करण्यात येईल. जेणेकरुन पावसाळी पाण्याच्या प्रवाहामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार आणि प्रवासह सुरळीत राखला जाईल,असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त
केला आहे.


मुंबईतील पावसाळासंदर्भातील कामकाजाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरात २९ मे ते १५ जून २०२५ दरम्यान टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासोबतच, मोहिमेत दररोज सकाळी १० वाजण्यापूर्वी स्वच्छता तसेच गरजेनुसार दुसऱ्यांदा झाडलोट अर्थात स्वच्छता (सेकंड स्विपिंग) करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांसोबतच निरनिराळे उपक्रमही राबविले जात आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरातील विविध भागांत स्वच्छता अबाधित राहावी, या उद्देशाने नियमित स्वच्छतेसोबत विशेष पुढाकार घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, पावसाळ्यात नियमित अंतराने कचरा गोळा व स्वच्छता करून स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणांवर टाकून देण्यात आलेल्या वस्तू, साहित्य यांचे संकलन करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे

Honda India Power Products Q2 Results: होंडा इंडिया पॉवरचा तिमाही निकाल जाहीर निव्वळ नफ्यात थेट ३०.८०% वाढ

मोहित सोमण: होंडा इंडिया पॉवर प्रॉपर्टी लिमिटेडने आपला आर्थिक तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

महाराष्ट्र शासनाचे रत्ने व आभूषणे धोरण जाहीर

मुंबई : राज्य सरकारनं रत्ने आणि आभूषण उद्योगाला जागतिक स्पर्धेत आघाडीवर नेण्यासाठी राज्य शासनाने ‘रत्ने व

पर्यावरणवादी पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांचे निधन

वयाच्या ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : प्रसिद्ध पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या