महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक

मुंबई : महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी एक्स पोस्टद्वारे २०२४ - २५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपये एवढी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती दिली. राज्यात २०२३ - २४ या आर्थिक वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा २०२४ - २५ या आर्थिक वर्षात ३२ टक्के जास्त परकीय गुंतवणूक आली.

भारतात २०२४ - २५ या आर्थिक वर्षात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. देशात २०२४ - २५ या आर्थिक वर्षात एकूण चार लाख २१ हजार ९२९ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे.

महाराष्ट्रात जानेवारी ते मार्च २०२५ या तिमाहीत २५ हजार ४४१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत नवा विक्रम करणारे ठरले. हा विक्रम महाराष्ट्राने नऊ महिन्यांतच मोडला.

आर्थिक वर्ष २०१५ - १६ : ६१,४८२ कोटी
आर्थिक वर्ष २०१६ - १७ : १,३१,९८० कोटी
आर्थिक वर्ष २०१७ - १८ : ८६,२४४ कोटी
आर्थिक वर्ष २०१८ - १९ : ५७,१३९ कोटी
एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ : २५,३१६ कोटी
आर्थिक वर्ष २०२० - २१ : १,१९,७३४ कोटी
आर्थिक वर्ष २०२१ - २२ : १,१४,९६४ कोटी
आर्थिक वर्ष २०२२ - २३ : १,१८,४२२ कोटी
आर्थिक वर्ष २०२३ - २४ : १,२५,१०१ कोटी
आर्थिक वर्ष २०२४ - २५ : १,६४,८७५ कोटी



Comments
Add Comment

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील