मेट्रो स्थानकात पाणी न साचण्यासाठी करावी लागणार उपाययोजना

मुंबई : मागील सोमवारी शहर भागांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वरळी आचार्य अत्रे रेल्वे स्थानक परिसरात पाणी शिरल्याने भविष्यात या मेट्रो स्थानकात असेच पाणी शिरले जाईल का अशाप्रकारची भीती वजा शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. परंतु मुंबई मेट्रो वनच्या माध्यमातून या स्थानकांच्या परिसरातील पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी स्वत: पंप बसवण्याचा यंत्रणा उभी केली असली तरी यासर्व स्थानक परिसरातील आजवर पडलेला पाऊस आणि साचलेला पाऊस याची माहिती जाणून घेवून मेट्रो आणि महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने संयुक्त सर्वे करून उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे मत काही निवृत्त अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.


मुंबई शहरातील काही भागांमध्ये सोमवारी सरासरी २०० ते २२५ मि.मी पावसाची नोंद झाल्याने या अचानक कोसळलेल्या पहिल्या पावसातच वरळीतील आचार्य अत्रे ऍक्वॉ मेट्रो रेल्वे स्थानकात प्रवेश मार्गाच्या परिसरात पाणी तुंबल्याने तात्पुरती उभारलेली भिंत कोसळली गेली आणि यातून साचलेले पाणी स्थानकात शिरले. या परिसरातील पर्जन्य जलवाहितील पाण्याचा प्रवाह योग्य प्रकारे न झाल्याने तसेच समुद्राला त्याच वेळी मोठी भरती असल्याने याठिकाणी पाणी साचले गेले आणि त्यामुळे भिंत कोसळून पाणी शिरले. परंतु ही स्थिती पहिल्याच पावसात घडल्याने भविष्यात काय होईल अशाप्रकारची भीती लोकांच्य मनात निर्माण झाली आहे.


मेट्रो रेल्वेची बहुतांशी रेल्वे स्थानके चौकांमध्ये तथा पर्जन्य जलवाहिन्या जिथे वक्राकार वळल्या जात आहेत,त्याठिकाणी आहे. त्यामुळे पर्जन्य जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह याच ठिकाणी संथ होवून जातो आणि अशातच समुद्राला मोठ्या स्वरुपाची भरती आणि पाऊस एकाच वेळी आल्यास भविष्यात अशी परिस्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे काही निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वे स्थानकांच्या परिसर हा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे, तेथील मागील २० ते २५ वर्षांत किती पावसाची नोंद झाली आहे, किती वेळा पाणी साचले आहे. तेथील पर्जन्य जलवाहिनीची स्थिती आदीची माहिती संकलित करून महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी आणि मेट्रोचे अधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी करून पुढील उपाययोजना आखल्यास योग्य ठरेल असे काही निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मुंबई मेट्रोच्यावतीने रेल्वे स्थानकांच्या परिसरात पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाची व्यवस्था केलेली आहे. परंतु, हे पंप अंतर्गत स्थानकाच्या परिसरात असतील तर मग बाहेरील बाजुस साचणाऱ्या पंपासाठी महापालिकेच्यावतीने अतिरिक्त पंप बसवले जाणार आहेत की मेट्रो स्वत: बसवणार याबाबतचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment

राज्यभरात एमआयएमने जिंकल्या तब्बल १२५ जागा

मुंबई (प्रतिनिधी) : "मुंबईत हिंदूंचा जन्मदर १.३ टक्के तर मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के म्हणजे दुप्पट आहे. त्यामुळे

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

पुणे महापालिका निवडणुकीत अनपेक्षित निकाल आंदेकर; प्रभाग २३ मध्ये धंगेकरांना धक्का

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मधून एक वेगळाच राजकीय निकाल समोर आला आहे. नाना पेठ आणि

Pune Andekar Family : सूनेनंतर सासूनेही मारलं मैदान ! पुण्यात लक्ष्मी आंदेकरचा थरारक विजय

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मध्ये चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत सूनेनंतर आता

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या