लातूर : उदगीरकडे जाताना ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, ३४ जण जखमी

लातूर : लातूरमध्ये दोन प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दोन खासगी बसची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याहून उदगीरकडे जाणाऱ्या कृष्णा व अभिनव ट्रॅव्हल्सचा गुरूवारी पहाटे ५ वाजता उदगीरकडे जात असताना औसा तालुक्यातील उजनी पासून एक किलो मिटर अंतरावर अपघात झाला. या घटनेत दोन जण ठार तर ३४ जण जखमी आहे. त्यात ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.




ट्रॅव्हल्सचा क्लिनर जागीच ठार


तुळजापूर ते लातूर महामार्गावर उजनी नजीक गुरुवारी पहाटे एकता बियर बार जवळ उदगीरकडे निघालेल्या कृष्णा ट्रॅव्हल्स क्रमांक AR ०१ Y ३५५५ या गाडीला पाठीमागून आलेली अभिनव ट्रॅव्हल्स MH २४ W १२१२ या गाडीने जोराची धडक दिली. यात कृष्णा ट्रॅव्हल्सची बस जागीच पलटी होऊन त्यात ३४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर अभिनव ट्रॅव्हल्सचा क्लिनर नामदेव व्यंकटराव सूर्यवंशी (वय ४०, रा अळवाई. ता भालकी. जि बीदर) हा जागीच ठार झाला.



या घटनेची माहिती मिळताच लातूर येथील पोलीस महामार्गचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय भोसले, योगीराज नागरगोजे व भादा पोलिस निरीक्षक महावीर जाधव, रतन मोरे, अनंत कांबळे, माऊली फड, अनंत शिंदे यांनी धाव घेतली. तसेच उजनी येथील हॉटेल चालक व कामगारांना मदतीसाठी बोलवण्यात आले. मयत नामदेव व्यंकटराव सूर्यवंशी यांचे पार्थिव उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

तोच फोटो ठरला शेवटची आठवण, एकाचवेळी झाला सात मित्रांचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंना

मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्याचा पुरावा आहे का ?

मुंबई : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण दिले

यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रण मंडळ १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजणार

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण

जातीयवादामुळे विद्यार्थ्याच्या नोकरीवर गदा?

महाविद्यालयावर आरोप; वंचित आघाडीचे आंदोलन पुणे  : पदवीधर झालेल्या प्रेम बिऱ्हाडे या दलित तरुणाला लंडनच्या

ऐन दिवाळीत 'काळाचा घाला'! नाशिकजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसमधून पडून २ युवकांचा दुर्दैवी अंत, १ गंभीर

नाशिक: मुंबईत पोटापाण्यासाठी गेलेल्या आणि दिवाळीच्या सणासाठी आपल्या कुटुंबीयांना भेटायला बिहारच्या दिशेने

प्रेम बिर्‍हाडेचा 'नोकरी'चा दावा खोटा? कॉलेजने उघड केले धक्कादायक सत्य!

पुणे: लंडनमध्ये आपली नोकरी गमावल्याचा भावनिक दावा करत समाजमाध्यमांवर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या प्रेम